गौतम गंभीरनंतर खासदार डॉ.हर्षवर्धन यांचा राजकारणाला रामराम!

ट्विटकरत दिली माहिती

गौतम गंभीरनंतर खासदार डॉ.हर्षवर्धन यांचा राजकारणाला रामराम!

पूर्व केंद्रीय मंत्री आणि दिल्लीतील चांदणी चौकातील विद्यमान खासदार डॉ.हर्षवर्धन यांनी राजकारणाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांनी आपल्या निर्णयाची माहिती सोशल मीडिया ट्विटरवर दिली.मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोकसभा निवडुकीसाठी चांदणी चौकातुन उमेदवारीची जागा न मिळाल्याने डॉ.हर्षवर्धन यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.आगामी लोकसभा निवडणुकीसाठी यावेळी भाजपकडून चांदणी चौक जागेसाठी प्रवीण खंडेलवाल यांना तिकीट दिले गेले आहे.

डॉ.हर्षवर्धन यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘तीस वर्षांहून अधिक काळ असलेल्या एका शानदार निवडणूक कारकिर्दीत, मी पाच विधानसभा आणि दोन लोकसभा निवडणुका लढवल्या, ज्या मी मोठ्या फरकाने जिंकल्या, पक्ष संघटना आणि राज्य आणि केंद्र सरकारमध्ये अनेक प्रतिष्ठित पदे भूषवली, पण आता मला माझ्या मूळ गोष्टींकडे परतण्याची परवानगी हवी आहे.

हे ही वाचा:

भारतीय नौदलाचा खलाशी बेपत्ता, शोध मोहीम सुरु!

दिल्लीतील बदरपूरमध्ये कारचे नियंत्रण सुटून ट्रकला धडक, तीन जणांचा मृत्यू!

तीन मिनिटात ब्राह्मणांना संपवतो म्हणणारा अटकेत

टेक कंपन्यांना ‘एआय’ प्रोडक्ट लाँच करण्यापूर्वी घ्यावी लागणार परवानगी

त्यांनी पुढे लिहिले की, ‘पन्नास वर्षांपूर्वी, गरीब आणि गरजूंना मदत करण्याच्या इच्छेने मी कानपूरच्या जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला प्रवेश घेतला, तेव्हा मानवतेची सेवा हे माझे ध्येय होते.मनापासून स्वयंसेवक असल्याने रांगेतील शेवटच्या माणसाची सेवा करण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे.संघाच्या तत्कालीन नेतृत्वाच्या विनंतीवरुन मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो.माझ्यासाठी राजकारण म्हणजे आपल्या प्रमुख तीन शत्रूंशी लढण्याची संधी-गरिबी,आजार आणि अज्ञान, असे डॉ.हर्षवर्धन यांनी ट्विटमध्ये लिहिले.

दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्लीतील भाजपा खासदार गौतम गंभीर याने देखील राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.गौतम गंभीर यांनी ट्विटकरत लिहिले की, “मी पक्षाध्यक्षांना विनंती केली आहे की मला माझ्या राजकीय कर्तव्यातून मुक्त करा जेणेकरून मी माझ्या आगामी क्रिकेट वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करू शकेन. मला जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधानांचे आणि गृहमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद!”

भाजपकडून प्रवीण खंडेलवाल यांना तिकीट
डॉ.हर्षवर्धन यांनी २०१४ मध्ये चांदणी चौक जागेतून खासदार म्हणून निवडून आले होते.२०१९ मध्ये भाजपने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि ते पुन्हा खासदार म्हणून निवडून आले.परंतु, आता या जागेसाठी भाजपाने उद्योगपती प्रवीण खंडेलवाल यांना तिकीट दिले आहे.

Exit mobile version