सरकार स्थापन करताचं धारावी प्रकल्प रद्द करणार

उद्धव ठाकरेंची दसरा मेळाव्यात थेट घोषणा

सरकार स्थापन करताचं धारावी प्रकल्प रद्द करणार

धारावीच्या माध्यमातून मुंबई लुटण्याचे काम सुरू आहे. चंद्रपुरची शाळा अदानी यांना दिली. कुर्ला मदर डेअरी, मिठागरे सर्व जागा दिल्या. सब भूमी अदानी की झाली. मग आम्ही का जगायचं. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मुंबई मिळवली. अदानी यांनी आम्हाला मुंबई दिली नाही. मी मुंबईसाठी लढतोय. तुमच्यासाठी लढतोय. आपली सत्ता आली तर धारावी प्रकल्प रद्द करणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

नरेंद्र मोदी तुम्ही फेक नरेटिव्ह तयार केला. यह लोग मंगळसूत्र निकालेंगे. तुम्ही महाराष्ट्राला लुटून महाराष्ट्राचं मंगळसूत्र देणार आहात का? आमचं सरकार आल्यावर धारावीचं टेंडर रद्द करणार आहे. धारावीकरांना दूर लोटायचं आणि मिठागरात टाकायचं, असा त्यांचा डाव आहे. परंतु, मी धारावीत पोलीसांना जागा देईल आणि मुंबईच्या बाहेर ज्यांना टाकलं जातंय त्यांना सर्वांना जागा देईन. गिरणी कामगारांना घरे देईन, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

“एक दोन महिने थांबा. आमचं सरकार येतंय. ११ दिवसांत १६०० शासन निर्णय जारी ही तुमची मस्ती. यातील अनेक निर्णय आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही. जे निर्णय राज्याच्या मुळावर येणार आहेत, बिल्डरच्या झोळ्या भरणारे आहेत ते रद्द करूच पण अधिकाऱ्यांना सांगतो या पापात सहभागी होऊ नका. नाही तर तुम्हाला तुरुंगात टाकू,” असा इशारा देत उद्धव ठाकरेंनी सरकार टीका केली.

“मुंबई महानगर पालिकेची एफडी तोडली. फक्त ४० हजार कोटी राहिले. ते पगारासाठी ठेवावे लागतात, तोडायला मिळत नाही म्हणून ठेवली आहे. ९० हजार कोटी उडवून टाकले. पावणे तीन कोटींची वर्क ऑर्डर यांनी काढली. कोणती कामे, कुणाला दिली, रस्त्यात कुणी खडी टाकली याचीही चौकशी व्हायला हवी. तीन लाख कोटी कुणाला दिले? कोणत्या कंत्राटदाराला दिले त्याची यादी हवी,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा :

‘हिऱ्यापोटी जन्मलेल्या गारगोट्यांना हिंदू म्हणवून घेण्याची लाज वाटते’

सत्तेत येताचं प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार

लुंगी, ब्लँकेटचा वापर करून पाच कैदी २० फुटी भिंत चढून फरार!

छत्रपती शिवाजी महाराजांनी उठाव केला होता, आम्हालाही करावा लागेल !

गायीला राज्यमातेचा दर्जा दिला. देशी प्रजाती वाचवलीचं पाहिजे. पण प्रश्न पडलायं, गाय राज्यमाता झाली मग राज्यभाषा काय आहे. गाईचा हंबरडा राज्यभाषा आहे. हा हंबरडा राज्यभाषा असेल तर कोवळ्या मुलींवर अत्याचार होत आहे त्यांचा हंबरडा तुमच्या कानावर का जात नाही. पहिलं आईला वाचवा, मग गायीला वाचवा आणि हे आमचं हिंदुत्व आहे. महागाईपासून दूर जाण्यासाठी गायीच्या पाठी लपत आहात, असा आरोप करत उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला आहे.

करोना काळात जे काम केले ते कर्तव्य म्हणून केले. हल्लीचं नागपूरला गेलो होतो. लोकांनी व्यथा सांगितल्या. सोयाबीनला भाव नाही. संत्र्यावर डिंक्या रोग येतो. कापसाच्या बोंडावर गुलाबी अळी येते. ती जॅकेट घालते की नाही माहीत नाही, असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी लगावला. अमित शाह तुमच्या भाजपाच्या खोडाला दाढीवाला खोडकिडा लागलाय आणि तुमच्या बोंडाला गुलाबी अळी लागली ती बघा. आम्हाला वाईट वाटतं एकेकाळचा आमचा मित्र पोखरला जातो. त्यांना सत्ता पाहिजे. कोणीही चालेल पण सत्ता पाहिजे. याला म्हणतात सत्ता जिहाद, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवतीर्थावर ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला. या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका केली.

Exit mobile version