वाझे प्रकरणात इनोव्हा, दोन मर्सिडीज नंतर प्राडोची एन्ट्री

वाझे प्रकरणात इनोव्हा, दोन मर्सिडीज नंतर प्राडोची एन्ट्री

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ॲंटिलिया घराबाहेरील स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणातील गुढ वाढले आहे. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यु झाला होता. या प्रकरणात सचिन वाझे याला ताब्यात घेण्यात आले होते; आता या प्रकरणातील नवे धागेदोरे उघड होत आहेत. आजच या प्रकरणातील दुसरी मर्सिडीज देखील एनआयएने ताब्यात घेतली होती. आता या प्रकरणातील प्रॅडो गाडीदेखील एनआयएने ताब्यात घेतली आहे. याच गाडीतून मनसुख हिरेन याला सचिन वाझेने चौकशीसाठी नेले होते. त्यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे.

हे ही वाचा:

लवकरच टोलमुक्ती होणार-नितीन गडकरी

धारावाईक रामायणातले राम, करणार भाजपाचे काम

अजानमुळे झोपमोड होत असल्याची तक्रार

अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्र्याच्या खाडीत संशयास्पदरित्या सापडला होता. मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांचे संबंध विरोधी पक्षाकडून उघड करण्यात आले होते. त्यानंतर सचिन वाझेला एनआयएने अटक केली. त्याची चौकशी चालू असताना या प्रकरणातील धागेदोरे उघड होत गेले.

या प्रकरणात आत्तापर्यंत चार गाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच या प्रकरणातील अनेक पुरावे देखील एक एक करून एनआयएच्या ताब्यात येत आहेत. विधानसभेच्या अधिवेशनात भाजपाने हा मुद्दा सातत्याने उचलून धरला होता.

Exit mobile version