केरळात ईदमुळे कोरोना वाढला?

केरळात ईदमुळे कोरोना वाढला?

केरळमधील कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये होणारी प्रचंड वाढ आता केरळच्या कम्युनिस्ट पक्षाच्या लक्षात येत आहे. बकरी ईदसाठी ३ दिवस निर्बंध शिथील करण्याचे आदेश देऊन आता नवीन रुग्णांमध्ये होणारी प्रचंड वाढ आटोक्यात आणावी लागणार आहे.

त्यासाठी केरळ सरकारने ३१ जुलै ते १ ऑगस्टला संपूर्ण लॉकडाऊन लादण्याचा निर्णय घेतला आहे. केरळमध्ये बुधवारी कोरोनाच्या २२,०५६ नवीन रुग्णांची नोंद झाली तर १३१ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात १,४९,५३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३१,६०,८०४ रुग्ण संसर्गातून बरे झाले आहे तर १६,४५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

केरळमध्ये कोरोना संसर्ग पुन्हा वाढत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सहा सदस्यांची टीम राज्यात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडावीया यांनी ट्वीट केले की, “केंद्र सरकार एनसीडीसी संचालकांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय टीम केरळला पाठवित आहे. केरळमधील कोविड प्रकरणांची संख्या अजूनही जास्त असल्याने ही टीम कोविड व्यवस्थापनात राज्याला मदत करणार आहे.

मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे, की हे पथक राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांसोबत काम करणार आहे, कोरोना परिस्थितीचा आढावा घेईल आणि व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक सूचना करेल.

हे ही वाचा:

कुठली भाषा वापरावी हे अजितदादांनी सांगावं म्हणजे राज कुंद्रांनी कुठला चित्रपट बघावा हे सांगण्यासारखं

काय आहे राकेश झुनझुनवाला आणि अकासा एरलाईन्स कनेक्शन?

पेगासिसची चिंता सोडा ‘पेंग्वीनची’ चिंता करा

‘ही’ अट मान्य केली, तर टेस्लाच्या गाड्या स्वस्त होणार

राज्यात कोरोना संसर्गाची सरासरी दैनंदिन प्रकरणे १७,४४३ पेक्षा जास्त आहेत. राज्यात संसर्ग दरही सर्वाधिक म्हणजे १२.९३ टक्के आणि साप्ताहिक दर ११.९७ टक्के आहे. सहा जिल्ह्यांमध्ये संक्रमणाचे आठवड्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. केरळमध्ये शनिवारी कोरोनाच्या १७,४६६ नवीन प्रकरणांची नोंद झाली. सोमवारी ११,५८६ तर मंगळवारी २२,१२९ नवीन रुग्ण आढळले.

Exit mobile version