आधी नितीश, केजरीवाल, नंतर महाराष्ट्र विरोधी पक्षांच्या एकजुटीला तडे

लोकसभा निवडणुकीत बसणार धक्का?

आधी नितीश, केजरीवाल, नंतर महाराष्ट्र विरोधी पक्षांच्या एकजुटीला तडे

आधी बिहारमध्ये मांझी यांनी नितीश कुमारांची साथ सोडली. नंतर विरोधी पक्षांच्या झालेल्या बैठकीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमधील कुरबुरी समोर आल्या. ‘आप’ने समान नागरी कायद्यावर केंद्र सरकारला सशर्त मंजुरी देऊन विरोधी पक्षांच्या एकजुटीला हादरा दिला होता. विरोधी पक्षांच्या एकजुटीत महत्त्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार स्वत:च्या पक्षाला सांभाळण्यात अपयशी ठरल्यामुळे या एकजुटीला तिसरा धक्का बसला आहे.

 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधी पक्षांना एकत्र करण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये शरद पवार यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जीही साथ देत आहेत. पाटण्यामध्ये विरोधी पक्षांची एकत्र बैठक २३ जून रोजी झाली. मात्र त्याआधीच यातील जीवनराम मांझी विरोधी पक्षांचा हात सोडून सत्ताधारी भाजपच्या गोटात जात आहेत.

 

बैठकीत आप आणि काँग्रेसमध्येही वाद दिसला. त्यानंतर समान नागरी कायद्यावर केंद्र सरकारला समर्थन देत ‘आप’ने विरोधी पक्षांना धक्का दिला. या धक्क्यातून विरोधी पक्ष सावरत असतानाच शरद पवार यांचे पुतणे अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या गटासह भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या सरकारमध्ये सहभागी झाले. विरोधी पक्षांची एकजूट भलेही देशातील अन्य राज्यांत चालली नाही, तरी बिहार आणि महाराष्ट्रात त्याचा चांगला परिणाम दिसेल, असे मानले जात होते. मात्र या राज्यांतच त्यांना धक्का बसला आहे.

 

बिहारमध्ये मांझी यांचा ‘हम’ पक्ष छोटा असला तरी या पक्षाची बिहारमध्ये तीन टक्के व्होट बँक आहे. हा मतटक्काही महत्त्वाचा आहे. तर, महाराष्ट्रात अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ यांच्यासह अन्य मोठे नेते सरकारमध्ये सामील झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.

अमित शहांची मध्यस्थी; दोन महिन्यांनंतर मणिपूरमधील राष्ट्रीय महामार्ग मोकळा उद्धव ठाकरेंना समदुःखी मिळाला ‘गोलमाल’मधील अभिनेते हरिश मैगन यांचे निधन ‘अनव्हेरिव्हाइड अकाऊंट’ असणारे एका दिवसात ६०० पोस्ट वाचू शकणार!

दुसरीकडे पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीत काँग्रेसने डाव्यांचा हात धरल्याने ममता भडकल्या आहेत. काँग्रेस भाजपला मदत करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर, उत्तर प्रदेशमध्ये मायावती यांचा बहुजन समाज पक्ष आधीपासूनच विरोधी पक्षांपासून लांब राहिला आहे. तर, बीआरएस प्रमुख केसीआर यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीचे नावच काढलेले नाही. एआएमचे ओवैसी प्रत्येक वेळी केंद्र सरकारवर दोषारोप करत असतात. मात्र तेही या आघाडीत सहभागी नाहीत.

 

राजकीय विश्लेषकांच्या मते, ज्या प्रकारे आताच विरोधी पक्षांमध्ये एकवाक्यता नाही, हे पाहता निवडणूकपूर्व आघाडीसाठी त्यांना बरीच कसरत करावी लागणार आहे.

Exit mobile version