पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या अखेरीस जम्मू आणि काश्मीरला भेट देणार आहेत. कलम ३७० रद्द केल्यानंतर केंद्रशासित प्रदेशाची ही त्यांची पहिली भेट असणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.
भाजपाच्या जम्मू आणि काश्मीर युनिटचे सरचिटणीस अशोक कौल यांनी येथे काश्मिरी पंडितांच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायती राज दिनी, सांबा येथे स्थानिक संस्था प्रतिनिधींच्या अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मिरी पंडित समाजाचे प्रतिनिधी यांच्यात बैठक घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जेणेकरून पंतप्रधान मोदींकडे पंडित समाज समस्या मांडू शकतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ऑगस्ट २०१९ मध्ये, केंद्राने राज्यघटनेच्या कलम ३७० अंतर्गत जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला आणि त्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले. कलम ३७० रद्द करण्यापूर्वी काश्मीरमध्ये पंचायत निवडणुका झाल्या होत्या, त्यातही भाजपाला मोठे यश मिळाले होते.
हे ही वाचा:
सरसंघचालक मोहन भागवतांच्या उपस्थितीत डेहराडूनमध्ये संघाची महत्वपूर्ण बैठक
अतिरिक्त आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी देणारे सपा नेते अटकेत
… म्हणून केंद्राकडून २२ यू-ट्युब वाहिन्यांना ‘टाळे’
संजय राऊतांच्या कष्टाची कमाई कोट्यवधींची
२०१९ च्या या मोठ्या निर्णयानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच जम्मू काश्मीरला जाणार आहेत. पंचायत राजच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करण्याच्या बहाण्याने पंतप्रधान मोदी काश्मिरी पंडितांनाही संबोधित करू शकतात. अद्याप अधिकृत माहिती आली नसली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मिरी पंडितांसाठी काही घोषणाही करू शकतात, असे मानले जात आहे.