क्राईम ब्रांच पाठोपाठ आता इओडब्ल्युच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

क्राईम ब्रांच पाठोपाठ आता इओडब्ल्युच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबईच्या पोलिस दलात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होणार आहे. यावेळी आर्थिक गुन्हे शाखेतील (इओडब्ल्यु) १३ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या आहेत.

सोमवारी याबाबतचे आदेश काढण्यात आले होते. पोलिस निरीक्षक आणि सहाय्यक पोलिस निरिक्षक अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. सहा अधिकाऱ्यांची वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली, दोघांची प्रत्येकी वाहतूक विभाग, विशेष शाखा आणि संरक्षण शाखेत बदली करण्यात आली, तर एका अधिकाऱ्याची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारच्या अकार्क्षमतेमुळे वसई- विरारमध्ये रुग्णांचा मृत्यु

राष्ट्रपती, पंतप्रधानांनी दिल्या हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा

नंदुरबारमध्ये रुग्णांसाठी रेल्वेचा मदतीचा हात

महाराष्ट्रात कोविड रुग्णांमध्ये घट

या बदल्यांचे आदेश अतिरिक्त आयुक्त (प्रशासकीय) विश्वास नांगरे पाटील यांनी काढले असल्याचे समजले आहे.

यापूर्वी २३ मार्च रोजी ८६ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ६५ अधिकारी क्राईम ब्रांचमधील होते. पोलिसांच्या बदल्यांमागे दिल्या जाणाऱ्या दलाली बद्दलचा रिपोर्ट जाहीर झाल्यानंतर या बदल्या करण्यात आल्या होत्या.

त्यानंर ३० मार्च रोजी पोलिस निरीक्षक पदावरील २४ अधिकाऱ्यांची क्राईम ब्रांचच्या विविध युनिटमध्ये बदली करण्यात आली होती.

सचिन वाझे याच्यामुळे आणि अनिल देशमुखांवर मुंबईचे माजी पोलि आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या खंडणीखोरीच्या आरोपांनंतर पोलिसांच्या बदल्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या दलालीचा प्रकार देखील एका अहवालाद्वारे उघडकीस आला होता.

Exit mobile version