सत्तेत येताचं प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार

उद्धव ठाकरेंची दसरा मेळाव्यात घोषणा

सत्तेत येताचं प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार

दसरा रामाने रावणाचा वध केला म्हणून साजरा करतो. प्रभू रामांबरोबर वानरसेना होती. ते आमचे देव आहेत. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजही आमचे देव आहेत. सरकारमध्ये आल्यावर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर बांधणार असल्याची घोषणा केली आहे. शिवाय प्रत्येक राज्यात महाराजांचे एक मंदिर उभारले गेले पाहिजे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराज हे मतं मिळवण्याची मशीन नाही. भाजपाने मतांसाठी महाराजांचा पुतळा उभारला. त्यातही त्यांनी पैसे खालले. पण, राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका लागणार आहेत. या निवडणुका जिंकून आपलं सरकार आल्यास राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर बांधणार आहोत, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. कोणाला याला विरोध करायचा असेल त्यांनी करावा, महाराष्ट्रातील जनता त्यांना बघून घेईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा :

लुंगी, ब्लँकेटचा वापर करून पाच कैदी २० फुटी भिंत चढून फरार!

छत्रपती शिवाजी महाराजांनी उठाव केला होता, आम्हालाही करावा लागेल !

हरयाणा भाजपा सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला!

होमगार्ड्ससाठी आनंदाची बातमी, मानधन केले दुप्पट!

राष्ट्रीय स्वयं संघाला १०० वर्ष होतील. सरसंघचालक, स्वयंसेवक यांच्याबद्दल आदर आहेच पण ते जे करतायत त्याबाद्द्द्ल आदर नाही. सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात, हिंदूंनी स्वरक्षणासाठी एकत्र या. तिकडे १० वर्ष विश्वगुरु बसलेत तरीही ते हिंदूंचे रक्षण करू शकले नाहीत. पूर्वी गुरखे रात्री म्हणायचे, जागते रहो मेरे भरोसे मत रहो हे म्हणजे तसे झाले आहे. राज्यात गद्दारी करून तुमच्या शकुनी मामाने आमचं सरकार खेचल ते संघाला दिसले नाही का? संघाने चिंतन शिबीर घ्यावे आणि पहावे ही भाजपा तुम्हाला मंजूर आहे का? आधीचा भाजपा वेगळा होता त्यात पावित्र्य होते. आताचे भाजपा हायब्रीड झाले आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली.

Exit mobile version