नवाब मलिक यांचा बिनशर्त माफीनामा

नवाब मलिक यांचा बिनशर्त माफीनामा

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या बद्दल आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत यापुढे कोणतेही विधान करणार नसल्याची हमी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले असून त्याविषयीचे हमीपत्र त्यांनी न्यायालयात सादर केले आहे.

नवाब मलिक यांनी बिनशर्त माफी मागितली असून यापुढे अशी वक्तव्ये, विधाने करणार नाही, याची हमी दिली त्यांनी प्रतिज्ञापत्रातून दिली आहे. नवाब मलिक यांनी त्यांचे ज्येष्ठ वकील ऍस्पी चिनॉय यांच्यामार्फत उच्च न्यायालयात त्यांचे म्हणणे मांडले असून चार पानांचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले आहे. मी फक्त माझ्या सरकारी सेवक पदाच्या अधिकारात वक्तव्ये केली. कोणाही विषयी वैयक्तिक मत व्यक्त केलेले नाही. तसेच यापूर्वी व्यक्त केलेल्या वक्तव्यांविषयी खेद व्यक्त करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

रुपेरी पडद्यावर पुन्हा चालणार राजामौलीची जादू! ‘आर आर आर’ च्या ट्रेलरचा धुमाकूळ

मुंबईत आता दिसणार लाल-पांढरे झेब्रा क्रॉसिंग

‘संजय राऊत यांच्या जिभेचे संशोधन करायला हवे’

महापौरांना धमकीचे पत्र; असे धमकीचे पत्र मिळणे ही गंभीर बाब भातखळकरांची प्रतिक्रिया

नवाब मलिक यांच्याविरोधात समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव यांनी मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यातील अंतरिम दिलासा मिळवण्याच्या मागणीवर एकलपीठातर्फे निर्णय दिला जाईपर्यंत वानखेडे कुटुंबीयांविरोधात कोणतेही वक्तव्य करणार नाही, अशी लेखी हमी नवाब मलिक यांनी दिली होती. मात्र त्यानंतरही नवाब मलिक यांनी वक्तव्ये करून आरोप केल्याचे ज्ञानदेव वानखेडे यांनी न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती र्मिंलद जाधव यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावरून नवाब मलिक यांना न्यायलयाने फटकारले होते.

हमी देऊनही मलिक यांनी वानखेडे यांच्याबाबत वक्तव्यं करणे हे गंभीर आणि न्यायालयाला दिलेल्या हमीचे उल्लंघन करणारे आहे. परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यापूर्वी त्यांनी न्यायालयाला दिलेल्या हमीचे उल्लंघन का केले हे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करावे, असे न्यायालयाने म्हटले होते.

Exit mobile version