एफकॉन्स कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

एफकॉन्स कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. शनिवार २२ मे रोजी आशिष शेलार यांच्या समवेत अखिल भारतीय नाविक संघाच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली. भेटीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना शेलार यांनी ही मागणी केली आहे.

एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही ओएनजीसीची कंत्राटदार कंपनी आहे. या कंपनीच्या हव्यासापायी अंदाजे ८० जणांचे जीव धोक्यात आले आहेत. यापैकी २५ जणांचा मृत्यू झाला तर बाकीचे लोक अजूनही बेपत्ता आहेत. हे या कंपनीच्या बेपर्वाईचे बळी आहेत. त्यामुळे या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेलार यांनी केली आहे.

हे ही वाचा:

‘ठाकरे सरकारचा पॅकेज देण्यावर विश्वास नाही, घेण्यावर आहे’

अनिल परबांनी शेतजमिनीवर बांधले अनधिकृत रिसॉर्ट

चला कोकणाला देऊ मदतीचा हात; मुंबई भाजपाने दिली हाक

भारतात ऑगस्टपासून दरमहिना तयार होणार ४ कोटी स्पुतनिक डोस

या दुर्घटनेत ‘बार्ज’ से कॅप्टन राकेश बल्लव यांनी ‘बार्ज’ वेळीच न हलवता इतरांचे जीव धोक्यात घातले, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या मृत्यूस तसेच दुखापतीस कारणीभूत ठरवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण या दुर्घटनेत केवळ कॅप्टनला कसे जबाबदार धरता येऊ शकते? असा सवाल शेलार यांनी केला आहे. सदर ‘बार्ज’ची कंत्राटदार कंपनी या घटनेला सर्वस्वी जबाबदार असून कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा असे शेलार यांचे म्हणणे आहे.

सर्व दोष कॅप्टनवर टाकून कंपनीचे मालक आणि संचालक यांना वाचवण्यासाठी ठाकरे सरकार आणि त्यांचे पोलीस काम करत आहेत असा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.

Exit mobile version