सदावर्तेना नागपूर, आरएसएस, फडणवीस यांच्याबद्दल विचारणा

ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंचा मोठा गौप्यस्फोट,

सदावर्तेना नागपूर, आरएसएस, फडणवीस यांच्याबद्दल विचारणा

महाविकास आघाडीच्या काळात ‘मला अडकवण्याचा प्लॅन होता’, असा आरोप काल ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस’ यांनी केल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली असतानांच या दाव्याला ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी दुजोरा दिला आहे. पत्रकारांशी बोलताना ॲडव्होकेट सदावर्ते यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनात मी कर्मचाऱ्यांची बाजू मांडत असल्याने मला अडकवण्याचा मुद्दाम प्रयत्न करण्यात आला होता पण पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यानंतर माझ्याकडून आणखी काही वदवून घेण्याचाहि प्रयत्न त्यावेळेस केला गेला, असा आरोपही गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

फडणवीस ,नागपूर आणि आरएसएस
आंदोलकांनी त्यावेळेस अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला होता, त्यावेळी मला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावून घेतलं होतं. डीसीपी निलोत्पल यांनी मला रात्री बोलावून माझ्याशी पवारांच्या हल्ल्यासंदर्भात चर्चा कमी तर नागपूर ,आरएसएस आणि फडणवीस यांच्याच भेटीगाठी संदर्भातील प्रश्न विचारले होते, असा दावा यावेळेस सदावर्ते यांनी केला आहे.माविआच्या या पुढाऱ्यांची त्यावेळेस बैठक झाली होती, त्याला आयुक्त संजय पांडे उपस्थित होते.या कटात त्यावेळेस आरएसएस आणि फडणवीस यांनाच अडकवायचं होतं असा दावा सदावर्ते यांनी केला आहे.
काहीही करून त्यांना माझ्या तोंडून वेगळंच काही वदवून घ्यायचं होतं, असा हा कट रचला गेला होता, असा दावा यावेळेस गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

हे ही वाचा:

जाणून घ्या तुमच्या नेत्याला’

भाजपाचे मिशन मुसलमान २०२४

मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेट दिले होते, पण…फडणवीस काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे भागम भागचा तिसरा भाग

दिलीप वळसे पाटील, विश्वास नांगरे पाटील, संजय पांडे यांच्या तोंडून त्या वेळी ‘कट’ असा शब्द निघाला होता. दिलीप वळसे पाटील, अजित दादा, नांगरे पाटील यांची नार्को चाचणी करा, अशी मागणीहि गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

पवारांच्या काळात दाऊद मोठा झाला’
पवारांच्या काळात दाऊद मोठा होऊन निघून जाणे हाच कट होता शरद पवार यांच्या काळात दाऊद मोठा होऊन निघून गेला तसा कटच होता. दिलीप वळसे पाटील,अजित दादा हे शरद पवारांचे प्यादे आहेत. संजय पांडेंना पोलीस आयुक्त म्हणून बसवण्यामागचं सुद्धा कारण हेच होतं. नुसता कट शिजला नाही तर ते जेलमध्ये कसे जातील असा प्रयत्न सुद्धा चालू होता. माझ्यावर दबाव होता. मी नावं घ्यावीत अशा अनुषंगाने मोहोळ उभं केलं जायचं, असा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय.शरद पवार हे अतिशय घाणेरडे राजकारणी आहेत. या कटामागे त्यांचाच हात होता, असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय.

Exit mobile version