26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाबंगाली दीदी विरुद्ध बिहारी बाबू

बंगाली दीदी विरुद्ध बिहारी बाबू

Google News Follow

Related

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये त्यांनी केलेल्या विधानावरून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पण ही तक्रार बंगालमध्ये नाही तर चक्क बिहारमध्ये दाखल केली गेली आहे. ममता बॅनर्जी यांनी बिहार राज्याचा अपमान केला असा आरोप करत बिहारी वकील बाबूंनी ही तक्रार दाखल केली आहे.

१ एप्रिल रोजी पश्चिम बांगालमध्ये विधानसभा निवडणुकांचा दुसरा टप्पा पार पडला. या टप्प्यात पश्चिम बंगालमधील ३० विधानसभेच्या जागांसाठी आपला कौल दिला. या वेळी बंगालमध्ये ८१% इतके मतदान नोंदवण्यात आले. या ३० जागांमध्ये ममता बॅनर्जी उभ्या असलेल्या नंदीग्राम या विधानसभा मतदारसंघातही मतदान पार पडले. यावेळी ममता बॅनर्जी यांनी नंदिग्राममध्ये कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा आरोप करत प्रचंड थयथयाट केला. यासंबंधी त्यांनी राज्यपालांना फोन केला असून त्यांच्यासोबतच निवडणूक अयोग आणि गृहमंत्रालयाकडेही तक्रार केल्याचे म्हटले आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजपावर आरोप केला. “निवडणुकीत हिंसाचार करायला भाजपाने युपी (उत्तर प्रदेश), बिहारमधून गुंड बोलावले आहेत” असे ममता यांनी म्हटले.

हे ही वाचा:

बंगाल,आसाममध्ये बंपर वोटिंग

“रक्ताचा खेळ यापुढे चालणार नाही”- मोदींचा दीदीला इशारा

शेतकरी आंदोलक लवकरच संसदेवर मोर्चा आयोजित करणार

सुपररस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

ममता बॅनर्जी यांच्या याच वक्तव्यावरून बिहारी वकील बाबू ऍड. सुधीर कुमार झा यांनी ममता बॅनर्जींविरोधात तक्रार दाखल केली आहे. मुजफ्फरपूरच्या चीफ ज्युडिशिअल मॅजिस्ट्रेट यांच्या कोर्टात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तात्काळ ममता बॅनर्जी यांच्या विरोधात एफआयआर दाखल कराव अशी मागणी ओझा यांनी केली आहे. त्यासोबतच ममता यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेची विविध कलमे लावण्यात यावीत अशी ओझा यांची मागणी आहे. यात १४७, १४८ (दंगल भडकावणे), २९५,२९५(अ ) (जाणीवपूर्वक अपमान करणे) आणि ५११ (गुन्ह्याचा प्रयत्न करणे) या कलमांचा समावेश आहे. ओझा यांच्या तक्रारीवर ८ एप्रिल रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा