मुंबई महापालिकेचा सध्याचा कार्यकाळ सोमवारी म्हणजेच आज संपला आहे. आतापर्यंत निवडणुकीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे पुढील सहा महिन्यांत पालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत उद्यापासून म्हणजेच ८ मार्चपासून मुंबई महापालिकेच्या कामकाजाची पाहणी प्रशासकाकडून केली जाणार आहे. तब्बल ३८ वर्षानंतर असे घडले आहे, बीएमसीचा कार्यकाळ संपला आणि निवडणुका झालेल्या नाहीत.
जोपर्यंत महापालिकेची निवडणूक होत नाही तोपर्यंत मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासक चालवणार आहे. मुंबई महापालिका चालवण्यासाठी प्रशासक नेमण्याची गरज बऱ्याच वर्षांनी निर्माण झाली आहे. तर महापौर किशोरी पेडणेकर या आतापासून काळजीवाहू महापौर राहणार आहेत. तर प्रशासकाची नियुक्ती ही आगामी सार्वत्रिक निवडणुकीनंतर होणाऱ्या महानगरपालिकेच्या पहिल्या सभेच्या दिनांकापर्यंत लागू राहणार आहे. तसेच प्रशासक कारभार सांभाळत असताना महापौर आणि इतर पदाधिकारी कोणतेही प्रशासकीय किंवा आर्थिक निर्णय घेऊ शकणार नाहीत.
शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. त्या म्हणाले की, “माझी महापौर आणि नगरसेवक म्हणून पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मी काळजीवाहू महापौर म्हणून काम करत राहणार आहे. ”
हे ही वाचा:
अभिनेते नसीरुद्दीन शाह ‘या’ गंभीर आजारामुळे त्रस्त
जागतिक महिला दिनी महिला पोलीस अंमलदारांना मिळाली मोठी ‘भेट’
रशिया युक्रेन युद्धामुळे भारतीय रुपया घसरला!
‘शरद पवार मानाची अपेक्षा ठेवतात, तर दुसरीकडे बगल में छुरी घेऊन फिरतात’
यापूर्वी महापालिकेची मुदत १९८४ मध्ये मुदत संपुष्टात आली होती. त्यावेळी १ एप्रिल १९८४ ते २५ एप्रिल १९८५ या एक वर्षाच्या कालावधीसाठी मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमण्यात आला होता. त्यामुळे, तब्बल ३८ वर्षांनंतर मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमला जात आहे.