मुंबईत कोविड-१९ च्या केसेस गेले काही दिवस वाढत आहेत. मुंबईत १७ हजारपेक्षा जास्त कोविड-१९ च्या केसेस आहेत. दरम्यान, मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे ताडोबाला रजेवर गेले असल्याचे समजत आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
Mumbai has more than 17 k COVID cases today!
There r talks of second wave!
While all this is happening in Mumbai Guardian minister Aditya T is busy holidaying in “Tadoba” since a few days ??
Who will save Mumbai then?— nitesh rane (@NiteshNRane) March 16, 2021
मुंबईसह महाराष्ट्रात कोविड-१९ च्या केसेसमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेकवेळा फेसबुक लाईव्ह करून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये लॉकडाउनही करण्यात आला आहे. मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करावा लागेल याचे संकेत अनेकवेळा ठाकरे सरकारने दिले. याशिवाय मुंबई महानगर पालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही असे संकेत दिले आहेत. मुंबईत कोविड-१९ च्या केसेस वाढत असताना मुंबई उपनगराचे पालकमंत्री, आदित्य ठाकरे मात्र ताडोबामध्ये सुट्टीवर आहेत, असे नितेश राणे यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
बलात्कार पीडितांची आई ‘या’ मुख्यमंत्र्याविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात
माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे निधन
माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे निधन
“मुंबईत कोविड-१९ चे १७ हजार पेक्षा जास्त रुग्ण आहेत. कोविडची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ शकते अशी चर्चा आहे. हे सर्व होत असताना मुंबईचे पालकमंत्री मात्र गेले काही दिवस ताडोबामध्ये रजेवर आहेत. अशा परिस्थितीत मुंबईला वाचवणार कोण?” असे ट्विट करून नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.
कालच भाजपाचे आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारच्या लॉकडाऊन करण्याच्या बोगस धोरणावर टीका केली होती. ठाकरे सरकारने, केंद्राने पुरवलेल्या लसींपैकी केवळ ४४ टक्केच लसी वापरल्याचे भातखळकरांनी सांगितले होते.