26 C
Mumbai
Wednesday, November 13, 2024
घरक्राईमनामाआदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी होणार

आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी होणार

दिशा सालियन प्रकरणी होणार चौकशी

Google News Follow

Related

ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. दिशा सालियन प्रकरणी राज्य सरकार आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात गुरुवार, ७ डिसेंबर रोजी ऑर्डर येण्याची शक्यता आहे. सुजाता सौनिक याप्रकरणी ऑर्डर काढू शकतात, अशी माहिती माध्यमांनी दिली आहे.

दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांची चौकशी व्हावी अशी मागणी सातत्याने काही आमदार करत होते. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवी यांनी यांनी गेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात या प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. दरम्यान, अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वात एसआयटी पथक काम करणार आहे.

दिशा सालियानच्या मृत्यूच्या वेळी आदित्य ठाकरे त्यावेळी कुठे होते? असा प्रश्न अनेक आमदारांकडून सातत्यानं उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे या चौकशीत अनेक पुरावे समोर येणार असल्याची माहिती आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी याप्रकरणी आदित्य ठाकरेंवर वारंवार आरोप केले होते. त्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी एसआटीमार्फत केली जाणार आहे.

दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू होता. पण सीबीआयनं या प्रकरणाला कोणतेही राजकीय वळण नसून दिशाचा मृत्यू हा इमारतीवरून तोल जाऊन पडल्यामुळे झाला आहे, असा निष्कर्ष काढला होता. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयनं वेगळा गुन्हा दाखल केला नव्हता. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात हे प्रकरणही तपासण्यात आलं होतं. दिशाचा मृत्यू झाला त्यादिवशी ती नशेत होती आणि तोल गेल्यानं छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला, असं सीबीआय तपासात समोर आलं होतं.

हे ही वाचा:

दादरमधील ‘भरतक्षेत्र’ दुकानावर छापेमारी; १५ लाख रुपये रोख जप्त

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; नऊ विधेयकं मांडणार

दलालाला पद वाटण्याच्या मजबुरीला काय म्हणावे?

पहिला सीमा, नंतर अंजु अन आता पाकिस्तानच्या जवेरिया खानमची चर्चा!

दरम्यान, मुंबईतील टॅलेंट मॅनेजर दिशा सालियन हिचा मृत्यू  ८ जून २०२० रोजी झाला. ८ जूनच्या मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून दिशा पडली होती. या घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजेच ११ जून रोजी दिशाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले.  शवविच्छेदन करण्यास दोन दिवसांचा विलंब का झाला? असे प्रश्न उपस्थित केले जात होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा