पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे वक्तव्य
आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने कारवाई केली आहे. त्यामुळे या कारवाईबद्दल राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. महाविकास आघाडीतील अनेक नेते संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. राऊतांवर झालेली कारवाई सर्व राजकीय हेतूने होतेय, अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
आदित्य ठाकरे हे पर्यायी इंधन परिषदेच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी पुणे दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमानंतर आदित्य यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. संजय राऊतांवर ईडीने केलेल्या कारवाईबद्दल आदित्य म्हणाले, ” राजकीय हेतूने कारवाई होत आहे, सूडाच्या राजकारणाची भावना घेऊन हे सर्व सुरु आहे. देशात जे काही सुरु आहे ते लोकशाहीचं, राजकीय वातावरण नसून दबावशाहीचं राजकारण आहे”, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.
संजय राऊतांवर बुधवारी ईडीने कारवाई केली. त्यात त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. राऊतांचे अलिबाग येथील आठ भूखंड आणि दादर येथील त्यांचा राहता फ्लॅट ईडीने जप्त केला आहे. तसेच एक हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणीही राऊतांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले असून राजकीय वातावरण तापले आहे.
हे ही वाचा:
सरसंघचालक मोहन भागवतांच्या उपस्थितीत डेहराडूनमध्ये संघाची महत्वपूर्ण बैठक
अतिरिक्त आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी देणारे सपा नेते अटकेत
राजू शेट्टींचा महाविकास आघाडीला रामराम!
कुठे आहे कायदा सुव्यवस्था? नांदेडमधील बिल्डर संजय बियाणी यांची गोळ्या घालून हत्या
संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितले की, ही सर्व मालमत्ता त्यांनी कष्टातून घेतली आहे. मात्र, एवढ्या कमी वेळात त्यांनी एवढे कोणते कष्ट केले की, कैक कोटी रुपयांची मालमत्ता त्यांची जमा झाली, असा प्रश्न राऊतांना विचारला जात आहे.