सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडत आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे ४० हुन अधिक आमदारांना घेऊन गुवाहाटीला दाखल झाले आहेत. हे सर्व सुरु असताना राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आता राजकारणात नवे वळण घेतले आहे. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून मंत्रीपद काढून टाकले आहे. त्यामुळे ते मंत्रिपद सोडणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काहीवेळा पूर्वीच, त्यांच्या ट्विटरवरून पर्यावरण मंत्रीपद काढून टाकले आहे. त्यामुळे ते आता मंत्रिपदाचा राजीनामा देणार का? असा सवाल केला जात आहे.
हे ही वाचा:
‘जास्तीत जास्त काय होईल सत्ता जाईल’
राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण
ठाकरे सरकार अडचणीत; ४० पेक्षा जास्त आमदार सोबत असल्याचा शिंदेंचा दावा
महिंद्रा ग्रुपनंतर ही कंपनी देणार अग्निवीरांना नोकरी
दरम्यान, एकनाथ शिंदे गुजरातला दाखल झाल्यांनतर लगेच एकनाथ शिंदे यांना काल शिवसेनेच्या गटनेतेपदावरून काढून टाकण्यात आले आहे. त्याबद्द्ल एकनाथ शिंदेंनी नाराजी व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३४ शिवसेनेचे आमदार आणि ६ अपक्ष आमदार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे मागील काही महिन्यांपासून राज्यामध्ये सुरु असणाऱ्या घडामोडी आणि राज्य सरकारच्या कारभारावर नाराज होते. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही कल्पना देण्यात आली होती, अशीही माहिती समोर येत आहे.