राज्यात सध्या दसरा मेळावा कुठे होणार यावर वाद सुरू आहे. दरम्यान, शिवसेना युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत शिंदे- फडणवीस सरकारवर टीका केली आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्यावरून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. वेदांताबद्दल अजूनही सरकारकडून उत्तर आलेलं नाही. वेदांतच्या अधिकाऱ्यांना सरकारच्या दबावामुळे ट्विट करावं लागलं. आताही केवळ घोषणा केली आहे. त्याचं पुढे काय? असा सवाल त्यांनी विचारला.
वर्सोवा वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठीच्या मुलाखती चेन्नईत होत असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे. “वर्सोवा वांद्रे सी लिंक हा मोठा प्रकल्प सुरू आहे. जी कंपनी काम करणार आहे, त्यांनी वॉक इन पद्धतीने मुलाखत चेन्नईमध्ये ठेवली आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या या प्रकल्पासाठी महाराष्ट्रात कुठेही मुलाखती न घेता चेन्नईमध्ये घेण्यात येणार आहेत. हे खातं मुख्यमंत्र्यांकडे आहे. या प्रकल्पाचं काम किती झालंय हेही अजून माहित नाही. चेन्नई, लुधियानामध्ये मुलाखती घेता येतात, मग मुंबईत का नाही?” अशी टीका त्यांनी केली.
मुंबईत प्रकल्प होत असताना इथल्या भूमिपुत्रांना संधी का दिली जात नाही? मुख्यमंत्र्यांचं लक्ष नाहीये? असे सवाल आदित्य ठाकरेंनी केले आहेत.
हे ही वाचा:
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतीवर पडला पडदा, चित्रपटाचा पडदा उघडला
पत्राचाळ प्रकरणातून मिळालेल्या पैशात संजय राऊत परदेश दौऱ्यावर गेले
“मास्क न वापरलेल्यांकडून कायद्याच्या कोणत्या तरतुदीनुसार दंड वसूल करण्यात आला?”
बायबलच्या ओळी वाचून पंतप्रधान ट्रस यांनी दिला एलिझाबेथना निरोप
आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले आहेत. ते स्वतःच्या कामासाठी गेले आहेत की महाराष्ट्रासाठी हे माहित नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. राज्यातील कितीतरी प्रकल्पांना खोके सरकारे स्थगिती दिली आहे? हे सरकारने सांगावं, अशी टीका देखील त्यांनी सरकारवर केली आहे.