भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे अपरिपक्व असल्याचा टोला लगावला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चिले जाणार्या विषयांवर आधीच भाष्य करणे हे अपरिपक्व पणाचे लक्षण आहे असा घणाघात भातखळकर यांनी केला आहे. महाराष्ट्रातील लॉकडाऊन संदर्भात आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर भातखळकरांनी हल्ला चढवला आहे.
देशात कोरोनाचा हाहाकार सुरू असताना त्याची सर्वाधिक झळ महाराष्ट्राला बसली आहे. कोरोना हाताळणीच्या बाबतीत सपशेल अपयशी ठरलेल्या महाराष्ट्र सरकारने राज्यात लॉकडाऊन लागू केला आहे. सध्या तरी मे अखेरपर्यंत राज्यात लॉकडाऊन लावला गेला असून हा लॉकडाऊन पुढे वाढण्याची चिन्ह आहेत. पण याबद्दल सरकारी पातळीवर अजून कोणतीही निश्चितता झालेली दिसत नाही.
हे ही वाचा:
मराठा आरक्षणावर दहा मिनिटांत सकारात्मक चर्चा?
ठाकरे सरकारमध्ये शिवसेनाच नाराज?
भाजपाचा शिवसेनेला ‘दे धक्का’, माथेरानमध्ये १० नगरसेवक फोडले
महाराष्ट्रातील सत्ताधार्यांच्या आदेशानेच पोलिसांची गुंडगिरी
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांकडून लॉकडाऊन संदर्भातील अनेक वक्तव्य केली जात आहेत. सरकारच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या या परस्परविरोधी वक्तव्यांनी महाराष्ट्राच्या जनते संभ्रम निर्माण होत आहे. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील लॉकडाऊन संदर्भात वक्तव्य केले. राज्यातील रुग्ण संख्या पाहून टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी सुरू होतील, लगेच लॉकडाऊन हटवला जाणार नाही असे विधान आदित्य ठाकरे यांनी केले.
यावरूनच भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी आक्रमकपणे सरकारची चांगलीच खरडपट्टी केली आहे. आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र सरकारचे प्रवक्ते कधीपासून झाले? असा सवाल भातखळकर यांनी विचारला आहे. तर सर्व निर्णय मी आणि माझा पक्ष घेतो हे दाखवण्याची आदित्य ठाकरे यांची धडपड असल्याचे भातखळकर यांनी म्हटले आहे.
सर्व निर्णय मी आणि माझा पक्ष घेतो हे दाखवण्याची @AUThackeray यांची धडपड. मंत्रिमंडळ बैठकी आधी तिथे चर्चिल्या जाणाऱ्या विषयांवर बोलणे हे अपरिपक्वतेचे लक्षण. pic.twitter.com/LaophDulb6
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 27, 2021