महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे आज, १५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. हा दौरा राजकीय नसून दर्शनासाठी आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. त्यामुळे अयोध्याविषयी बोलूयात राजकारणाविषयी नको, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
आयोध्येत राम मंदिर निर्माण होत असताना शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. आमचं हिंदुत्त्व स्वच्छ आहे. जनतेला दिलेलं वचन पाळणं हेच आमचं हिंदुत्त्व आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
हा अयोध्या दौरा केवळ राम लल्लाचं दर्शन घेण्यासाठी असून रामराज्य यावं म्हणून प्रार्थना करत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. २०१८ मध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत आलो असताना त्यांनी आधी मंदिर नंतर सरकार असा नारा दिला होता. त्यानुसार घटनाही घडत आहेत, असही आदित्य ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी महाराष्ट्र सदन उत्तर प्रदेशमध्ये बनवण्यासाठी संपर्क करणार आहेत. यासाठी ते पत्रव्यवहार देखील करणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. शंभर खोल्यांचे किंवा त्याहून अधिक खोल्यांचे असे महाराष्ट्र सदन बनवायचं आहे. अनेक भाविक महाराष्ट्रातून राम लल्लाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात त्यांची सोय व्हावी यासाठी हे महाराष्ट्र सदन असेल, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा:
आयपीएल मीडिया राईट्सच्या लिलावातून बीसीसीआयने कमावले इतके रुपये
कुलगाममध्ये बँक मॅनेजरची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचा खात्मा
‘क्रांतिकारी गॅलरीतून राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळेल’
प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉ. प्रकाश बाबा आमटे रुग्णालयात
आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते संजय राऊत, एकनाथ शिंदे असे काही वरिष्ठ नेतेदेखील उपस्थित आहेत. शिवाय महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत.