‘भाजपने खंजीर खुपसला, आम्ही मात्र मैत्री जपतो’

‘भाजपने खंजीर खुपसला, आम्ही मात्र मैत्री जपतो’

आदित्य ठाकरे गोव्यातून बोलले

गोव्यात १४ फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. त्यापूर्वी गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज गोव्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे यांनी यावेळी गोव्यासंदर्भातील त्यांचा प्लॅन सांगितला. मात्र, त्यासोबतच त्यांनी भाजपवर टीका केली.

भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचे यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले. आपण मैत्री जपतो, स्वच्छपणे पुढे नेतो. मात्र, भाजपने खंजीर खुपसला आहे. एनडीएमध्ये इतर पक्षांच्या पाठीतही त्यांनी खंजीर खुपसला आहे म्हणूनच इतर पक्षही स्वतंत्रपणे लढत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. आम्ही महत्त्वाचे नाही मग आमच्यावर टीका का करता? असा सवालही त्यांनी विचारला आहे. गोव्यात चांगले सरकार यावे यासाठी आम्ही निवडणूक लढत आहोत, असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

‘राऊत आणि परबांसाठी अनिल देशमुखांच्या बाजूच्या खोल्या सॅनिटाइज कराव्यात’ 

एकनाथ आव्हाडांचे ‘शब्दांची नवलाई’ बालकवी पुरस्कारने सन्मानित

ठाकरे सरकारमधील मंत्री संदीपान भुमरे अडचणीत

आज पडणार IPL चा हातोडा! कोण होणार मालामाल? कोणाला मिळणार ठेंगा?

स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळावा त्यांचा आवाज बुलंद व्हावा यासाठी काम करणार आहोत, असेही ते म्हणाले. शिवसेना आता गोवेकरांच्या घराघरात पोहचली आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. गोव्यात शाश्वत विकास करण्याची विचारधारा असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेचे ११ उमेदवार उभे आहेत ते सर्व निवडून येऊन विधानसभेत जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version