26 C
Mumbai
Saturday, January 11, 2025
घरराजकारणआदित्य ठाकरेंच्या मनपाविरोधातील मोर्चाचे शिंदेंविरोधातील सभेत रूपांतर

आदित्य ठाकरेंच्या मनपाविरोधातील मोर्चाचे शिंदेंविरोधातील सभेत रूपांतर

विरोधकांना तुरुंगात टाकण्याची वापरली भाषा

Google News Follow

Related

महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराविरोधात उद्धव ठाकरे गटाने मुंबईत काढलेला मोर्चा हा नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधातील सभेत रूपांतरित झाला. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नक्कल करण्याबरोबरच त्यांनी शिंदे यांच्यावर विखारी आरोप केले. तसेच आपली सत्ता आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या लुटारूंना आपण जेलमध्ये टाकणार असल्याची घोषणाही करत विरोधकांवर कारवाईची एकप्रकारे धमकी दिली.

उद्धव ठाकरे अनुपस्थित

या मोर्चामध्ये यावेळी ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांसह शिवसैनिकांनी मोर्चामध्ये सहभाग घेतला होता. उद्धव ठाकरे मात्र या सभेत उपस्थित नव्हते. आदित्य ठाकरे यांना गटाचे नवनेतृत्व म्हणून लाँच करण्याचा हा प्रयत्न होता, अशी चर्चा या मोर्चाच्या निमित्ताने सुरू होती.

या मोर्चाचे मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीजवळ सभेत रूपांतर झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर असलेला राग आपल्या भाषणातून काढला. ते म्हणाले की, “मी आज सांगून ठेवतो, ज्यादिवशी आमचं सरकार येईल, त्या दिवशी मुंबईच्या लुटारुंना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. ज्या दिवशी आमचं सरकार आलं तुम्हाला आत घेणार आणि तुमची जागा दाखवणार. वांद्रे येथील शाखेवर केलेल्या कारवाईविरोधातला राग आदित्य ठाकरेंनी या सभेत काढला.

यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना आदित्य ठाकरेंनी हे भगवं वादळ फक्त मुंबईतलं आहे म्हणत महाराष्ट्रातही असे आंदोलन करणार असल्याचे सांगितले. त्याचवेळी हनुमान चालिसातील श्लोकाचा उल्लेख त्यांनी केला आणि विरोधकांना भूताची उपमा दिली. आदित्य ठाकरेंच्या भाषणात एकनाथ शिंदे, भाजपा शिवसेना युतीविरोधातला संताप पुन्हा दिसला. सगळीकडे घोटाळे सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. “मुंबईवर एसआयटीची चौकशी लावली तशी ठाणे, नागपूर, पुणे महापालिकांवर लावा. त्यांनी घोटाळेच केले आहेत, दुसरं काहीच केलेलं नाही. मुंबईत एवढं घाणेरडं राजकारण बघितलं नव्हतं, असं म्हणत,

“मुंबई महापालिकेच्या या वास्तूवर भगवाच असेल, असा दावा करत पालिकेत आपली सत्ता असताना गेल्या २५ वर्षात आपण कामं करुन दाखविली आहेत, असाही दावा त्यांनी केला. पण, एक वर्ष मुंबई महापालिकेत नगरसेवक, कमिटी, चेअरमन काहीच नाही. सर्व ठिकाणी कुलूप लावलेलं दिसत आहे. प्रशासक आहेत पण, तुमचा आवाज त्यांना ऐकू येतोय का, तुमची चिंता त्यांना आहे का? असे म्हणत त्यांनी आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यावर शरसंधान केले. गेल्या २५ वर्षांत सगळा चांगला कारभार चालला असे सूचित करताना एका वर्षात स्थिती बदलल्याचे त्यांच्या भाषणातून सांगण्यात आले. तुम्ही बिल्डर म्हणून आला तर रेड कार्पेट टाकलं जाईल. पण नागरिक म्हणून आला तर वेळ नाही. खोके घ्यायची वेळ आहे, असं सांगितलं जाईल,” असे ते म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी ही मुंबई आमची आहे असे सांगितले. मुंबईतील रस्त्यांची कामे कशी चालतात हे त्यांनी गेली सात वर्षे मंत्री म्हणून महाराष्ट्र शासनात काम केलेल्या एकनाथ शिंदे यांना सांगितले. रस्त्यांच्या खाली ४२ युटीलिटी असतात. पाण्याच्या पाईपलाईनपासून ते गॅसच्या पाईपलाईन असतात. सगळ्या विभागांशी बोलून नीट ठरवून रस्त्याचं काम करावं लागतं. वाहतूक पोलिसांना विचारुन काम करावं लागतं. १६ वेगवेगळ्या एजन्सी असतात. म्हाडा, रेल्वे, एमआरडीए यांच्या सगळ्यांशी बोलून काम करावं लागतं. आपल्या मुख्यमंत्र्यांना त्याबाबत माहिती नाही. त्यांनी सात वर्ष मंत्रीपदाचा अनुभव असला तरी माहिती नाही,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

ममतांचा दुखावलेला पाय निवडणुकीत करामत करणार?

भारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्री म्हणतो, १०० हा माझ्यासाठी केवळ आकडा!

समृद्धी महामार्ग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा आक्रोश मोर्चा रद्द; ठाकरे गट मोर्चा काढण्यावर ठाम

नीरज चोप्राची पुन्हा अव्वल कामगिरी

आपण कसे मुंबई महानगरपालिकेचे ६०० कोटी वाचवले असा दावाही त्यांनी केला.

कधी काम सुरु होण्याच्यापूर्वी पैसे दिले जातात का? ६०० कोटी रुपये त्यांच्या मित्राच्या खिशात जाणार होते. पण मी पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे ६०० कोटी रुपये वाचले.

आपण मुंबई महानगरपालिकेसाठी खूप मेहनत घेतल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. त्यांनी सांगितले की, “मला पप्पू म्हणतात ना, मी पप्पू चॅलेंज देणार. तर, या अंगावर मी आव्हान देतो. ५० रस्तेही तुम्ही पूर्ण करु शकत नाहीत. आम्ही गेले १० वर्ष फिरत आहोत.

यावेळी आदित्य ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेतील काही घोटाळ्यांचे आरोप केले. खडी घोटाळा, स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा, सॅनेटरी पॅड वेडिंग मशिनचा घोटाळा यावरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा