लोकसभेत गदारोळ; माफीची मागणी
काँग्रेसचे खासदार अधीररंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल अनुदार उद्गार काढल्यामुळे लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला. अधीररंजन यांनी माफी मागावी अशी मागणी केली गेली. राष्ट्रपतीऐवजी राष्ट्रपत्नी असा उल्लेख केल्यामुळे अधीररंजन चौधरी देशभरात टीकेचे लक्ष्य बनले आहेत.
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या ईडीकडून सुरू असलेल्या चौकशीच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते नवी दिल्लीत आंदोलन करत होते. त्यावेळी एका पत्रकाराने अधीररंजन यांना प्रश्न विचारला की, आंदोलन कसे होणार आहे, राष्ट्रपतीभवनला तुम्ही भेट देणार आहात का, त्यावर अधीररंजन म्हणाले की, आम्ही राष्ट्रपतींची भेट घेणार आहोत पण आम्हाला अडवले जात आहे. हे सांगताना त्यांनी राष्ट्रपतीऐवजी त्यांनी राष्ट्रपत्नी असा शब्द दोनवेळा वापरला. तेव्हा पत्रकाराने त्यांना राष्ट्रपती असा शब्द वापरण्यास सांगितले.
#WATCH | "There is no question of apologising. I had mistakenly said 'Rashtrapatni'…the ruling party in a deliberate design trying to make mountain out of a molehill," says Congress MP Adhir R Chowdhury on his 'Rashtrapatni' remark against President Murmu pic.twitter.com/suZ5aoR59u
— ANI (@ANI) July 28, 2022
यावर अधीररंजन चौधरी यांना पत्रकारांनी विचारल्यावर त्यांनी स्पष्टपणे माफी मागण्यास नकार दिला. शिवाय, भाजपाकडे माफी मागणार का असे विचारल्यावर भाजपाकडे आपण का माफी मागावी असा प्रतिसवाल त्यांनी विचारला. चुकून असा शब्द बाहेर पडला, असे ते म्हणाले. आधी राष्ट्रपती म्हणालो, मग राष्ट्रपत्नी असा शब्द निघाला.
हे ही वाचा:
नवसंजीवनी, नवसंजीवनी… बीएसएनएलला १.६४ लाख काेटींचे घसघशीत पॅकेज
अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून आतापर्यंत मिळाले ५० कोटी
शिंदे-फडणवीस सरकार येताच बुलेट ट्रेन फास्ट ट्रॅकवर
हिंदू पूर्वज असलेल्यांसाठी विहिंपची ‘घरवापसी मोहीम’
अधीररंजन म्हणाले की, दोन दिवस आम्ही विजय चौकमध्ये आंदोलन करत होतो. तेव्हा मी सांगितले की आम्हाला राष्ट्रपतीजींना भेटायचे आहे. पण आम्हाला भेटू दिले नाही. तेव्हाच राष्ट्रपती बोलताना मी राष्ट्रपत्नी बोललो. तेव्हा मी पत्रकारांना सांगण्याचा प्रयत्न केला की, हे उद्गार दाखवू नका. एकदाच मी असे बोललो. चुकून बोललो. पण सत्ताधारी पक्ष त्यावर आकांडतांडव करत आहेत.
यावर सोनिया गांधी यांनाही पत्रकारांनी विचारले तेव्हा अधीररंजन यांनी माफी मागितली असल्याचे सोनिया गांधी रागावून बोलल्या.