गेल्या काही वर्षांपासून भारतात हिंदू दहशतवादाचा एक बागुलबुवा उभा करण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला जात आहे. भारताच्या माजी गृहमंत्र्यांपासून ते अनेक सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांपर्यंत या शब्दाचा जाणीवपूर्वक वापर करून हिंदूत्ववादी संघटनांना आणि हिंदूत्व विचारधारेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सध्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानी दहशतवाद्यांनी जो उच्छाद मांडला आहे त्याच्या आडून हिंदूत्वाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न भारतातील काही व्यक्ती आणि संस्था करताना दिसत आहेत. यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांपासून ते कला क्षेत्रातील व्यक्तींपर्यंत सर्वांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
स्वरा भास्करच्या अजब तर्कावर ‘अरेस्ट स्वरा’ वायरल
ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाने का झापले?
अफगाणिस्तान विषयावर मोदींनी घेतली महत्वाची बैठक
तालिबानचे ‘उदार’ धोरण एका दिवसात बंद
पण हिंदू दहशतवाद म्हणत ओरड करणाऱ्या या सर्वांनाच एका युवा अभिनेत्रीने खडे बोल सुनावले आहेत. ही अभिनेत्री म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये प्रसिद्ध असलेली आणि नुकतेच बॉलिवूडमध्येही जिने सुपरहिट चित्रपट दिले आहेत अशी प्रणिता सुभाष.
प्रणिता हिने ट्विटरवरून आपले विचार व्यक्त करताना ‘हिंदू दहशतवाद’ असा शब्द वापरणाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. ‘हिंदू दहशतवाद हा शब्द वापरून अफगाणिस्थानमध्ये जे घडत आहे त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. सावधान भारत! आपले शत्रू ते फक्त सीमारेषेच्या पलीकडे उपस्थित नाही तर ते आपल्या आजूबाजूलाच आहेत’ असे ट्विट प्रणिताने केले आहे.
Apologists in India are using 'Hindu terror' as a defense to whitewash what's happening in Afghanistan. Attempts to legitimise the concept will remain a figment of their imagination.
Beware, Bharat! Enemies are not just present beyond our borders, they're around you too.
— Pranitha Subhash (@pranitasubhash) August 18, 2021
प्रणिता सुभाष ही कायमच ट्विटरवरून अनेक सामाजिक राजकीय विषयांवर परखड भाष्य करत असते अलीकडेच प्रणिता चे हंगामा 2 आणि भुज द प्राइड ऑफ इंडिया हे दोन चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. पण प्रणिताचे हे ट्विट म्हणजे स्वरा भास्करला लगावलेला टोलला तर नाही ना? असा प्रश्न विचारला जात आहे. कारण आपल्या आक्षेपार्ह ट्विटमुळे कायम चर्चेत असणारी अभिनेत्री स्वरा भास्कर हिने नुकतेच ‘हिंदूत्व टेरर’ असा शब्द वापरत वादग्रस्त असे ट्विट केले होते. ज्यामुळे ट्विटरवर चांगला संताप व्यक्त केला जात असून स्वराला अटक करण्याची मागणी देखील केली जात आहे.