‘ठाकरे सरकारच्या डर्टी डझनवर कारवाई होणारच’

‘ठाकरे सरकारच्या डर्टी डझनवर कारवाई होणारच’

भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सौमय्या यांनी पुन्हा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकार मराठी माणसांना लुटते, २५ वर्ष महापालिकेवर शिवसेनेने गैरप्रकारे राज्य केले आहे, अशी टीका सौमय्या यांनी शिवसेनेवर केली आहे. नुकतीच ईडीची कारवाई झालेले यशवंत जाधव यांच्यावरही निशाणा त्यांनी साधला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना सौमय्या म्हणाले, ” ठाकरे सरकारच्या डर्टी डझनवर कारवाई ही होणारच आहे. याची सुरवातही झाली आहे, नुकतीच यशवंत जाधव यांच्यावर ईडीची कारवाई होऊन त्यांची बेनामी मालमत्ता जप्त होत आहे. या यशवंत जाधव यांची भागीदारी विमल अग्रवाल यांच्याशी आहे, याच अग्रवाल यांनी बुलेटप्रूफ जॅकेटच्या घोटाळा केला त्यांच्याशीच जाधव यांची भागीदारी होती. तसेच संजय राऊत यांनी जे आमच्यावर आरोप केलेत त्याचे कागदपत्रे द्यावीत, ” असे सौमय्या म्हणाले.

पुरावे नसताना पोलिसांनी मला यांना अटक कशी केली, असा सवालही सौमय्या यांनी केला आहे. संजय राऊत यांनी म्हटलं होत राकेश हे किरीट सौमय्यांचे पार्टनर आहेत, याचेही त्यांनी पुरावे दिले नाहीत. न्यायालयाने देखील नील सौमय्या यांना निर्दोष सिद्ध केले आहे, फक्त ठाकरे सरकार त्यांनी केलेले घोटाळे लपवण्यासाठी आमच्यावर असे खोटे आरोप लावत असल्याचे सौमय्या म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

आंध्रप्रदेशच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा

UNHRC मधून रशिया निलंबित

इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर मतदान होणार

मुद्रा योजनेची सात वर्ष! १८.६० कोटी रुपयांची कर्ज वितरित

विक्रांत बचाव ही मोहीम बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली १९९८ मध्ये सुरु झाली होती. जेव्हा भाजपा शिवसेनेची संयुक्त सत्ता होती तेव्हाच विक्रांतच्या स्मारकासाठी मोहीम सुरु केली होती. मात्र त्यांनतर काँग्रेसचे सरकार आले आणि त्यांनी विक्रांतला भंगारमध्ये काढले. विक्रांत वाचवा ही मोहीम शिवसेना भाजपा नेत्यांनी केली होती. शिवसेनेने स्वतः पुढाकार घेऊन विक्रांत वाचवण्यासाठी पैसे दिले होते. त्यानंतर विक्रांत वाचवण्यासाठी काही कार्यकर्ते चर्चगेट इथे जमून निधी गोळा केली होती. मात्र संजय राऊत यांनी अकरा वर्षानंतर मुद्दा काढला की विक्रांतसाठी ५८ कोटी रुपये जमा झाले आणि ते मी घेतले मात्र याचे पुरावे नाहीत, तर राज्यपालांच्याही उत्तरात नाही. संजय राऊत अडकले आहेत म्हणून ते असे सगळे आरोप करत आहे, ठाकरे सरकार मुंबई पोलिसांचा गैरवापर करत आहेत, असे सौमय्या म्हणाले आहेत.

Exit mobile version