विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने (एमपीसीसी) बंडखोरांवर कारवाई केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षविरोधी कारवायांसाठी सात अतिरिक्त बंडखोर उमेदवारांना निलंबित करून शिस्तभंगाची कारवाई पक्षाने केली आहे. नव्याने निलंबित करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये शामकांत सनेर, राजेंद्र ठाकूर, आबा बागुल, मनीष आनंद, सुरेश कुमार जेथलिया, कल्याण बोराडे आणि चंद्रपॉल चौकसे यांचा समावेश आहे.
याआधी काँग्रेस पक्षाकडून २१ बंडखोरांना निलंबित करण्यात आले होते, ज्यामुळे एकूण २२ मतदारसंघात निलंबनाची संख्या २८ झाली आहे. यापूर्वी निलंबित करण्यात आलेल्या नेत्यांच्या यादीत आनंदराव गेडाम, शिलू चिमुरकर, सोनल कोवे, भरत येरमे, अभिलाषा गावतुरे, प्रेमसागर गणवीर, अजय लांजेवार, विलास पाटील, आस्मा जावद चिखलेकर, हंसकुमार पांडे, कमल व्यवहारे, मोहनराव दांडेकर, मंगलराव दांडेकर, मोहनराव दांडेकर यांचा समावेश आहे. मनोज शिंदे, सुरेश पाटीलखेडे, विजय खडसे, शाबीर खान, अविनाश लाड, याज्ञवल्य जिचकार, राजू झोडे, राजेंद्र मुका हे निलंबित उमेदवार महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत.
हे ही वाचा:
न्यूटन, गॅलिलिओपेक्षाही समकालिन शिवाजी महाराज, महाराणाप्रताप बुद्धिमान, तेजस्वी
अफजलखान वध म्हणजेच शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने साजरा होणार शिवप्रताप सप्ताह
मुंबई विभाग शालेय ऍथलेटिक्समध्ये ठाणे मनपा ऍथलेटिक्स योजनेतील मुलांचे यश
लग्न पत्रिकेवर ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा, पंतप्रधान मोदींसह योगींचाही फोटो!
यापूर्वी, काँग्रेस नेते रमेश चेन्निथला म्हणाले होते की, अधिकृत महाविकास आघाडीच्या उमेदवारांविरुद्ध लढणाऱ्या सर्व पक्षीय बंडखोरांना सहा वर्षांच्या निलंबनाला सामोरे जावे लागेल. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका २० नोव्हेंबर रोजी होणार आहेत, सर्व २८८ मतदारसंघांसाठी २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने १०५ जागा जिंकल्या, शिवसेनेला ५६ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या.