शरद पवारांचा खोटारडेपणा उघड; तेढ निर्माण केल्याबद्दल पवारांवर कारवाई होणार का?

शरद पवारांचा खोटारडेपणा उघड; तेढ निर्माण केल्याबद्दल पवारांवर कारवाई होणार का?

आमदार अतुल भातखळकर यांनी केली मागणी

जेम्स लेनने महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबाबत केलेल्या स्पष्टीकरणानंतर मुंबई भाजपाचे प्रभारी आणि आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार यांचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला आहे, असे आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे. तसेच राज्यात जातीय तेढ निर्माण केल्याबद्दल पवारांवर कारवाई व्हावी अशी मागणीही केली आहे.

आमदार भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ज्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात मराठी विरुद्ध ब्राह्मण असा वाद पेटवला गेला तो मुद्दाच निकाली निघाला आहे. Shivaji:Hindu King in Islamic India चा लेखक जेम्स लेन याने आपण बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी कधी बोललोच नव्हतो असे स्पष्ट केले आहे.

आमदार भातखळकर यांनी यासंदर्भात जेम्स लेनने जे स्पष्टीकरण इंडिया टुडेकडे केले आहे, त्याची लिंक देत शरद पवार यांच्यावर शरसंधान केले आहे. हा घ्या पुरावा असे म्हणत पवारांनी जी विधाने बाबासाहेब पुरंदरे यांच्याबाबत केली होती, त्यावर त्यांनी टीका केली आहे.

शिवाय, आमदार भातखळकर यांनी अशी मागणीही केली आहे की, महाराष्ट्रात विनाकारण पेटवापेटवी केल्याबद्दल आणि सातत्याने शिवशाहिरांबद्दल गरळ ओकल्याबद्दल शरद पवार माफी मागणार का? राज्यात जातीय तेढ निर्माण केल्याबद्दल पवारांविरुद्ध कारवाई व्हायला हवी.

जेम्स लेनने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत आपली बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी कधीही भेट झाली नव्हती असे स्पष्टीकरण दिले आहे. त्यावरून आता महाराष्ट्रातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले असून शरद पवार तसेच त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरेंवर जेम्स लेन प्रकरणी जी चिखलफेक केली त्याला सडेतोड जवाब मिळाला आहे. लेनच्या या मुलाखतीमुळे पुरंदरेंवर आरोप करणाऱ्यांचा बुरखाही फाटला आहे.

Exit mobile version