‘सोमैय्यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई बेकायदेशीर’

‘सोमैय्यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई बेकायदेशीर’

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माजी खासदार किरीट सोमैय्या यांना स्थानबद्ध करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात टीका केली आहे. किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई ही बेकायदेशीर आहे, आम्ही त्याचा निषेध करतो. राज्य सरकारविरोधातील आमचा संघर्ष सुरूच राहील, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

माजी खासदार किरीट सोमैय्या हे ठाकरे सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कथित बेनामी संपत्तीची पाहणी करण्यासाठी कोल्हापूरला जाणार आहेत. पण त्यांना मुलुंड येथील निवासस्थानात स्थानबद्ध करण्यात आले आहे. तेथे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. त्याविरोधात आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

याबाबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, किरीट सोमैय्या यांच्यासंदर्भात जी कारवाई राज्य सरकार करते ती अयोग्य आणि निषेधार्ह आहे. सोमैय्या हे मंत्री हसन मुश्रीफ यांचा कथित दुसरा घोटाळा उघड करण्यासाठी, कागदपत्रे गोळा करण्यासाठी कोल्हापूरला जाणार होते. पण १४४ कलम लावून त्यांना तिथे येण्यासाठी अटकाव करण्यात आला. ते देवदर्शन करून जाणार होते. पण अशाप्रकारची मुस्कटदाबी सरकारने करणे योग्य नाही. मुलुंड याठिकाणी सोमैय्या यांच्या घराबाहेर ३०-४० पोलिस ठेवण्यात आले आहेत. ही कारवाई लोकशाहीसाठी अजिबात शोभनीय नाही. या कारवाईचा आम्ही निषेध करतो.

हे ही वाचा:

लालपरीचे उत्पन्न १२ कोटी, खर्च २५ कोटी

पंजाबमध्ये ‘पंजा’चा गोंधळ सुरूच! सुखजिंदर रंधावांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत

‘सावरकर: विस्मृतीचे पडसाद’ पुस्तकाचे बाबासाहेब पुरंदरेंच्या हस्ते प्रकाशन

धक्कादायक! वापरलेले तेल पुन्हा विकले जात आहे रस्त्यावरील खाद्यपदार्थ बनविण्यासाठी

दरेकर पुढे म्हणाले की, कोंबडं झाकलं तरी उजाडायचे थांबत नाही. या कारवाईने सत्य लपवता येणार नाही. सोमैय्या जे काही करायचे आहे ते करतीलच. पण जे दबावाचे राजकारण राज्य सरकार करते आहे ते लोकशाहीला मारक आहे, लोकशाहीला विसंगत आहे.

Exit mobile version