दिल्लीतील रोहिंग्या बांगलादेशींचा ठावठिकाणा शोधण्यासाठी दिल्ली भारतीय जनता पार्टीने मोहीम सुरू केली आहे. रोहिंग्या मुस्लिमांची माहिती देण्यासाठी त्यांनी दिल्लीकरांना खुले पत्र लिहिले आहे. रोहिंग्या-बांगलादेशींच्या ठावठिकाणाबाबत महापालिका कारवाई करेल, असे दिल्ली भाजपाचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी म्हटले आहे. तर केजरीवाल यांनी आपल्या आमदारांना रोहिंग्या-बांगलादेशींची काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
आदेश गुप्ता यांनी पत्रात म्हटले आहे की, आम आदमी पक्षाचे नेते ज्या प्रकारे भाजपा नेत्यांवर खोटे आणि बिनबुडाचे आरोप करत आहेत त्यामुळे न्यायालय त्यांना त्याची जाणीव करून देत आहे. न्यायालयाने हे देखील मान्य केले आहे की आपचा सल्लागार ताहिर हुसेन हा दंगलीचा केवळ प्रेक्षकच नाही तर मुख्य आरोपी आहे. ताहिर हुसेनने २२ फेब्रुवारी रोजी दंगलीपूर्वी पोलिस ठाण्यात जमा केलेले त्याचे परवाना असलेले पिस्तूल आणि १०० काडतुसे मिळाली होती. मात्र दंगलीनंतर पोलिसांच्या छाप्यात ६६ काडतुसे, २२ रिकामे कवच सापडले आणि १४ काडतुसे कुठे गेली, हे अद्याप कळू शकलेले नाही.
आम आदमी पक्षाचा नगरसेवका दिल्ली दंगलीत सहभाग असूनही त्यांच्यावर केजरीवाल यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. आम आदमी पक्ष आज दंगलखोरांचा पक्ष झाला आहे, असा आरोप भाजपाने केला आहे. २ वर्षे तुरुंगात असूनही आम आदमी पक्षाने नगरसेवक ताहिर हुसेन यांची पक्षातून हकालपट्टी केलेली नाही. केजरीवाल यांची काय मजबुरी आहे की ते ताहिर हुसेनसह दंगलखोरांना पक्षातून बाहेर काढू शकत नाहीत, असा सवाल भाजपाने केला आहे.
दंगलीत हिंदू समाजाच्या मालमत्तेला जाणीवपूर्वक आग लावण्यात आल्याचेही न्यायालयाचे म्हणणे आहे. ताहीर हुसेन यांच्यासोबत असणाऱ्यांचा मुख्य उद्देश हिंदू समाजाच्या संपत्तीला आग लावून त्यांना मारणे हा होता. या दंगलीत ५३ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला, अशी माहिती गुप्ता यांनी पत्रातून दिली.
काही दिवसांपूर्वी आप नेत्या निशा सिंह यांना ७ वर्षांची तुरुंगवास भोगावा लागला होता. आम आदमी पार्टी रोहिंग्या बांगलादेशींना संरक्षण देत आहे, त्यासाठी सर्वसामान्यांना पुढे यावे लागेल. केजरीवाल सरकारने आपल्या सर्व आमदारांना रोहिंग्या बांगलादेशींना मोफत वीज, पाणी, रेशन, त्यांच्या वडिलधाऱ्यांना निवृत्ती वेतन आणि मुलांना शाळांमध्ये प्रवेश देण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे सर्व बैठक घेऊन ठरवले जात आहे. मनीष सिसोदिया स्वतः सर्व आमदारांना सूचना देत आहेत की, अशा कोणत्याही रोहिंग्या किंवा बांगलादेशींना सोडले जाऊ नये, ज्यांच्याकडे आधारसोबत रेशन कार्ड आणि मतदार कार्ड नाही, असंही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये IIM च्या स्थायी परिसराचे लोकार्पण
‘उद्धव ठाकरे यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी’
बीडच्या अविनाश साबळेने मोडला तीस वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम
सलमान म्हणतो, ‘आनंद दिघे आणि माझ्यात हे साम्य’
गुप्ता यांनी दिल्लीकरांना आवाहन केले आहे की, बांगलादेशात जिथे जिथे रोहिंग्या स्थायिक असतील तिथे त्यांचा पत्ता द्यावा, त्यांच्यावर महापालिका कारवाई करेल. यासोबतच दिल्ली पोलिसांनाही माहिती दिली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत दंगलखोरांना आश्रय देणाऱ्यांना सोडले जाणार नाही.