भाजपाकडून ४० बंडखोरांवर कारवाईचा बडगा

राज्यातील ३७ विधानसभा मतदारसंघातील ४० बंडखोरांवर कारवाई

भाजपाकडून ४० बंडखोरांवर कारवाईचा बडगा

राज्यात सध्या प्रचार सभांचा धडाका सुरू असून विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. यंदा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा महत्त्वाच्या लढती अनेक ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, उमेदवारी जाहीर होत असताना दोन्ही बाजूंच्या पक्षांमधील अनके नेत्यांकडून बंडखोरी पाहण्यास मिळाली. बंडखोरांना समजावण्याचे कामही करण्यात आले. मात्र, तरीही पक्षाचा आदेश न मानणाऱ्या नेत्यांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. भाजपाकडून बंडखोरांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

भाजपाकडून एक अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षशिस्त आणि अनुशासन भंग करणारे कृत्य केले असून ही कृती पक्ष अनुशासन भंग करणारी आहे त्यामुळे आपल्याला तत्काळ पक्षातून निष्कासित करण्यात येत आहे, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बंडखोरांवर कारवाई करण्याचे संकेत दिले होते.

भाजपाने राज्यातील ३७ विधानसभा मतदारसंघातील ४० बंडखोरांवर कारवाई केली आहे. पक्षाचा आदेश डावलून शिस्तभंग केल्याबद्दल या नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. महाराष्ट्र कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी हे परिपत्रक काढले आहे.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंनी मुंब्र्यात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून दाखवावा!

‘गादी’वान झाले ताटाखालचं मांजर; मग अपमान होणारच ना ?

सरकार प्रत्येक खासगी मालमत्ता ताब्यात घेऊ शकत नाही

दिल्लीतील हवेची गुणवत्ता घसरली पराली जाळल्यामुळे आणि गाड्यांच्या धुरामुळे

विधानसभा निवडणुकीसाठी ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती. भाजपाने अनेक बंडखोरांची समजूत घालून अर्ज मागे घेण्याचा प्रयत्न केला. बोरीवली विधानसभा मतदारसंघात बंडखोरी केलेल्या गोपाळ शेट्टींनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी समजूत घालण्यात आली. त्यानंतर गोपाळ शेट्टी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र, इतर अनेक मतदारसंघातील बंडखोर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे पक्षाने कठोर पावले उचलत बंडखोरांवर कारवाई केली आहे.

Exit mobile version