उत्तर प्रदेशातील देवरिया येथे जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला.पंतप्रधान मोदी म्हणाले की, समाजवादी पक्षाचे ते जंगलराज, ज्यात बहिणी आणि मुलींना घराबाहेर पडणे कठीण झाले होते.मात्र, जेव्हा पासून योगी आले तेव्हापासून यामध्ये बदल झाला आहे.कारण आमचे योगी ‘अच्छे-अच्छों की गर्मी उतारने में एक्सपर्ट हैं'(चांगल्या-चांगल्या लोकांची गर्मी बाहेर काढण्यात एक्सपर्ट आहेत).
देशात लोकसभेच्या सहाव्या टप्प्याचे मतदान काल पार पडले.आता उर्वरित शेवटचा म्हणजे सातव्या टप्प्याचे मतदान पार पडणार आहे. ८ राज्यांमधील एकूण ५७ लोकसभा मतदारसंघासाठी १ जूनला मतदान होणार आहे.दरम्यान, पंतप्रधान मोदींची आज देवरिया येथे सभा पार पडली.या सभेला लोकांची प्रचंड गर्दी होती.सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, समाजवादी पार्टीचे जेव्हा सरकार होते तेव्हा परिस्थिती बेकार होती.बहिणी-मुलींना घराबाहेर पडणे अत्यंत कठीण होते.सरकारी जमीन हडप करून त्यावर माफियांनी महाल बांधले होते.मात्र, योगी आदित्यनाथ आल्यापासून हे चित्र बदलले.कारण, आमचे योगी चांगल्या-चांगल्या लोकांची गर्मी बाहेर काढण्यात एक्सपर्ट आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
‘मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी इंडी आघाडी संविधान बदलणार’
डोंबिवली स्फोटप्रकरणातील शोध थांबला, तीन कामगार अद्याप बेपत्ता!
शिक्षिकेचा आवाज काढून सात विद्यार्थिनींवर बलात्कार
भावेश भिंडेला २९ मे पर्यंत पोलीस कोठडी!
ते पुढे म्हणाले, भारताच्या प्रगतीमुळे काहींच्या पोटात दुखत आहे.हे लोक ४ जूनला घेऊन वेगळीच स्वप्ने बघत आहेत.सपा-काँग्रेस, इंडी आघाडीसाठी पाकिस्तानातून प्रार्थना केली जात आहे.सीमेच्या पलीकडील जिहादी त्यांना साथ देत आहेत.सपा-काँग्रेस वाल्यांचा मुद्दा देशाचा विकास नाही तर हे भारताला अनेक दशके मागे घेऊन जाण्याचा आहे.