‘संजय राऊत यांना तात्काळ राज्यसभेतून निलंबित करा’

‘संजय राऊत यांना तात्काळ राज्यसभेतून निलंबित करा’

संजय राऊत यांनी काल मुंबईत शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली. त्यानंतर भाजप नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, भाजपाचे आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी खासदार संजय राऊत यांना ताकाळ राज्यसभेतून निलंबित करा, अशी मागणी केली आहे.

भाजपचे आचार्य तुषार भोसले यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून संजय राऊत यांना तात्काळ राज्यसभेतून निलंबित करण्याची विनंती केली आहे. पत्रकार परिषदेत खुलेआम शिवीगाळ करणारे शिवसेना खासदार संजय राऊत हे साधु- संतांनी घडवलेल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहेत. वेळोवेळी खालच्या दर्जाची भाषा वापरणाऱ्या संजय राऊतांना राज्यसभा सदस्य, या संवैधानिक पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करावे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

हे ही वाचा:

‘२५ हजार कोटींचा घोटाळा झाला म्हणताय, मग तुम्ही काय दोन वर्ष झोपला होता का?’

भारत की वेस्ट इंडिज? कोण ठरणार टी-२० चा दादा?

‘त्या १९ बंगल्यांचा कर रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर भरतायत’

ज्येष्ठ संगीतकार बप्पी लहिरी यांचे निधन

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर घाणाघाती टीका केली आहे. कोरलाई येथील १९ बंगल्यांचे कर रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर हे भरत असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले. त्यानंतर भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनीही संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे संजय राऊत म्हणाले मग दोन वर्ष काय झोपले होते का हे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. माहिती आहे, पुरावे आहेत तर तक्रार का करत नाहीत. मुख्यमंत्र्यांना का सांगत नाहीत असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

Exit mobile version