काँग्रेसला ‘सनातन’चा शाप भोवला

काँग्रेस नेते कृष्णम यांचे मत

काँग्रेसला ‘सनातन’चा शाप भोवला

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजपाला यश मिळाल्यानंतर देशपातळीवर एक उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. काँग्रेसला हा फार मोठा धक्का मानला जात आहे. मात्र या सगळ्या पराभवानंतर एकीकडे काँग्रेस नेते आपला बचाव करताना दिसत असले तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी एक्सवर संदेश लिहिले आहे की, सनातन का श्राप ले डूबा! म्हणजेच सनातनच्या शापामुळे काँग्रेस बुडाली.

हे ही वाचा:

मोदींवरील विश्वासाचं हे यश!

बुद्धिबळ स्टार प्रज्ञानंद आणि वैशालीने केली कमाल!

मध्यप्रदेशमध्ये लाडली योजनेचा प्रभाव

हवाई दलाला मिळाल्या १५३ अग्निवीरवायू महिला

कृष्णम यांनी या पराभवासंदर्भात विश्लेषण करताना म्हटले आहे की, काँग्रेसने सातत्याने सनातन धर्माचा विरोध केला. हिंदू धर्माच्या विरोधात काँग्रेस निवडणूक लढवत आहे. पण हा मुद्दा देशाला पसंत नाही. जोपर्यंत काँग्रेस सनातन धर्माचा विरोध करत राहील तोपर्यत त्यांचा पराभव निश्चित आहे. सनातन धर्माचा विरोध केल्यामुळेच काँग्रेस बुडाली आहे. त्यामुळे हा सनातन धर्माच्या विरोधामुळे मिळालेला शाप आहे. ज्याठिकाणी काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला आहे, त्याठिकाणी काँग्रेसच्या प्रभारींनी राजीनामा दिला पाहिजे.

 

Exit mobile version