१५ हजारांच्या जातमुचलक्यावर आरोपी दत्ता दळवींना जामीन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी झाली होती अटक

१५ हजारांच्या जातमुचलक्यावर आरोपी दत्ता दळवींना जामीन

ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. अखेर दत्ता दळवी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुलुंड न्यायालयाने दत्ता दळवींना जामीन मंजूर केला आहे. १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे.

ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांना मुलुंड न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ठाणे कारागृहातून दत्ता दळवी यांची शुक्रवार, १ डिसेंबर रोजी सुटका होणार आहेत. गेल्या २ दिवसांपासून दत्ता दळवी कारागृहात होते. कोणत्याही समाज आणि समूहा विरोधात, दत्ता दळवी यांनी अवमानकारक वक्तव्य न केल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी दळवींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली होती.

४१ अ ची नोटिस न देता दत्ता दळवी यांना अटक केल्याचा दावा त्यांच्या वकीलांनी केला होता, त्यांच्या दाव्याची न्यायालयाने नोंद घेतली आहे. पोलिसांनी सेक्शन १५३ गैरलागू केल्याचाही दावा दळवी यांच्या वकिलांनी केला होता, या स्टेजवर हे मान्य होऊ शकत नाही, असं निरिक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.

आरोपी दत्ता दळवी यांचं वय आणि मेडिकल हिस्ट्री न्यायालयाने लक्षात घेत दत्ता दळवी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. काही अटी आणि शर्ती पाळण बंधनकारक असणार आहे. त्यांना मुख्यमत्र्यांविरोधात कोणतंही अवमानकारक वक्तव्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचं प्रक्षोभक वक्तव्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. पोलीसांना सहकार्य करण बंधनकारक आहे.

हे ही वाचा:

कुठे गेली पाकिस्तानमधून आलेली अंजू? मुलांनीही भेटण्यास दिला नकार

विजेचे बिल होते चार हजार रुपये; जमा झाले १९७ कोटी!

हवामान बदल शिखर परिषदेसाठी मोदी दुबईत!

‘बोगद्यातून सुटका झालेले सर्व कामगार तंदुरुस्त’

कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये, याची काळजी घेणं बंधनकारक राहणार आहे. दळवी यांच्या जामीन अर्जास, मुंबई पोलिसांनी सक्त विरोध केला होता. दळवी यांचे वकिल संदीप सिंग यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. १५ हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Exit mobile version