भाजपा नेत्या सना खान यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याला जबलपूरमधून अटक करण्यात आली असून त्याने हत्येची कबुलीही दिली आहे. सना खान १ ऑगस्टपासून बेपत्ता होत्या. त्या दोन दिवसांत परत येते, असे सांगून गेल्या होत्या. परंतु त्या परतल्याच नाहीत.
भाजपा नेत्या सना खान याच्या हत्येप्रकरणी पोलिसांच्या गुन्हे विभागाने पप्पू उर्फ अमित शाहू याला जबलपूरमधून अटक केली. चौकशीत त्याने हत्येची कबुली दिली आहे. भाजपा नेत्या सना खान त्यांच्या व्यावसायिक भागिदाराला भेटण्यासाठी जबलपूर येथे गेल्या होत्या. तेव्हा त्यांनी मी दोन दिवसांत परतते, असे सांगितले होते. मात्र एक आठवडा झाला तरी त्या परतल्या नाहीत. तसेच, त्यांचा फोनही बंद आढळून येत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी नागपूरच्या माणकापूर पोलिस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. सना या त्यांच्या व्यावसायिक भागिदार पप्पू शाहू याला भेटण्यासाठी जबलपूर येथे गेल्या होत्या.
हे ही वाचा:
स्वातंत्र्यदिनी राज्यातील १८६ कैद्यांची कारागृहातून होणार सुटका
‘न्यूजक्लिक’ प्रकरणी ईडीची उच्च न्यायालयात धाव
शिवसेना, राष्ट्रवादीत व्हीपचा राडा, एकमेकांना पाडा
१८ वर्षांपूर्वी अंतराळ सफरीचे तिकीट काढणाऱ्याचे स्वप्न झाले साकार!
पप्पू हा मद्यतस्करीच्या गुन्ह्यांत सहभागी होता तसेच, जबलपूरजवळ एका ढाबा चालवत असे. सना आणि पप्पू यांच्या मध्ये गेल्या काही दिवसांपासून पैशांच्या व्यवहारावरून वाद सुरू असत. सना या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल होताच नागपूर पोलिसांचे पथक जबलपूरला गेले होते. मात्र, पोलिसांनी त्याला गाठायच्या आधीच तो कुटुंबासह फरार झाला होता. त्यानंतरही सतत पोलिस त्याचा शोध घेत होते. अखेर पोलिसांनी त्याला गाठलेच. आता त्याला नागपूरमध्ये आणले जात आहे.