सर्वेक्षणानुसार एनडीए ४०० पार करणार!

‘मेगा ओपिनियन पोल’ची आकडेवारी

सर्वेक्षणानुसार एनडीए ४०० पार करणार!

लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होऊन आचारसंहिता लागू होईल अशी परिस्थिती असताना सर्वच पक्ष निवडणुकांच्या तयारी लागले आहेत. अनेक पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान, भाजपा आणि एनडीएने ‘अब की बार ४०० पार’ असा नारा दिला आहे. त्यादृष्टीने जोरदार तयारीही सुरू केली आहे. अशातच गुरुवार, १४ मार्च रोजी ‘नेटवर्क १८’ने ‘मेगा ओपिनियन पोल’ घेतला. यात झालेल्या पोलनुसार एनडीए ४०० चा आकडा पार करणार असल्याचे समोर आले आहे.

ओपिनियन पोलनुसार भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला ४०० हून अधिक जागा मिळणार आहेत. विशेष म्हणजे पहिल्यांदाच एखाद्या सर्वेक्षणात एनडीएला ४०० हून अधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मेगा ओपिनियन पोल नुसार, एनडीएला ४११ जागा मिळू शकतात. लोकसभेची एकूण संख्या ५४३ एवढी आहे. ३७० जागा भाजपा एकटा जिंकेल असा दावा भाजपा करत आहे मात्र, ओपिनियन पोलनुसार, या निवडणुकीत भाजपला ३५० जागा मिळू शकतात. मात्र, असे झाल्यास भाजपाला २०१९ च्या तुलनेत ४७ जागा अधिक मिळतील.

सर्वेक्षणानुसार एनडीएला कुठे किती जागा मिळतील?

याशिवाय अनेक राज्यांमध्ये एनडीएचा ग्राफ वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. यात ओडिशामध्ये १३, पश्चिम बंगालमध्ये २५, तेलंगनामध्ये ८, आंध्र प्रदेशात १८ जागा, तर गुजरातमध्ये एनडीएला २६ जागा मिळण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

‘मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मागून कोणीतरी धक्का दिला’

पेट्रोल-डिझेलच्या किमती २२ महिने। स्थिर राहिल्यावर घटल्या!

‘एक राष्ट्र, एक निवडणूक घेतल्याने कार्यक्षमता वाढेल, वित्तीय स्थिरता बळकट होईल’

तीन तलाक ते राम मंदिर…

इंडी आघाडीचे काय?

ओपिनियन पोलनुसार, विरोधी पक्षांच्या इंडी आघाडीला १०५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला केवळ ४९ जागाच मिळू शकतात. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीतही काँग्रेसला केवळ ४४ जागाच मिळाल्या होत्या.

Exit mobile version