राहुल गांधी मोजतात पीठ लिटरमध्ये

वाचून करत असलेल्या भाषणादरम्यान त्यांनी पिठाचा दर किलोऐवजी लिटरमध्ये सांगितला आहे.

राहुल गांधी मोजतात पीठ लिटरमध्ये

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे रविवारी महागाईवर भाष्य करत होते. यावेळी राहुल गांधींनी यूपीए सरकारच्या काळात गॅस, तेल, दूध आणि पिठाची किमती सांगायला सुरुवात केली. पण वाचून करत असलेल्या भाषणादरम्यान त्यांनी पिठाचा दर किलोऐवजी लिटरमध्ये सांगितला आहे. नेहमीप्रमाणे त्यांच्या झालेल्या या चुकीमुळे सोशलमीडियावर त्यांना ट्रोल केले जात आहे.

राहुल गांधी यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर महागाई आणि बेरोजगारीविरोधात ‘हल्ला बोल’चे आयोजन केले होते. भाषणात राहुल गांधी यांनी यूपीए सरकार आणि एनडीए सरकारच्या काळात महागाईची तुलना करायला सुरुवात केली. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, माझ्याकडे महागाईचे आकडे आहेत. २०१४ मध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत ४१० रुपये होती, आज ती १ हजार ५० रुपये आहे. आज पेट्रोल ७० रुपये लिटर, आता पेट्रोल सुमारे १०० रुपये प्रति लिटर, डिझेल ७० रुपये लिटर होते ते आज ९० रुपये प्रति लिटर आहे अशा प्रकारे ते सांगत होते. यावेळी त्यांनी पिठाचा भाव २२ रुपये लिटर होता तो आता ४० रुपये लिटर झाला असल्याचे म्हटले आहे. त्यावेळी जमलेल्या लोकांना हसू आले असता त्यावेळी राहुल गांधी यांना त्यांची चूक लक्षात आली. पिठाचे मोजमाप किलोमध्ये करतात त्याऐवजी राहुल गांधींनी पिठाला लिटरमध्ये मोजले आहे. सोशलमीडियावर यामुळे नेटकऱ्यांनी राहुल गांधींवर चांगलाच निशाणा साधला आहे.

हे ही वाचा:

हिंदू संस्कृतीबद्दल डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी इंग्रजांना काय सुनावले?

शहेनशाह जहाँ बैठते है, दरबार वही लग जाते है…

पोलीसाच्या मित्रानेच सोनाराला लुटले…

‘केरळमध्ये काम करण्यासाठी देशभक्तीबरोबरच बलिदान आणि शौर्यही हवे’

राहुल गांधींची व्हायरल क्लिप पोस्ट करत अनेक फेसबुक युजर्सनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. तसेच ट्विटरवर भाजपा नेते कपिल मिश्रा यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. कपिल मिश्रा यांनी ट्विट करत म्हटले की, पीठ २२ रुपये लिटर आहे, कृपया त्यांना अध्यक्ष करा. यासोबतच त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, महागाईवर बोलताना जर तुम्ही पिठाची किंमत लिटरमध्ये सांगितली तर तुमची समज आणि गांभीर्य या दोन्हींवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. अख्खी काँग्रेस किलोच्या भावाने विकून टाकल्यावर असा भोळेपणा त्यांना कायम तरुण असल्याचे सिद्ध करतो.

 

Exit mobile version