देशातील लोकसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर आलेल्या असताना आता सर्वचं पक्षांकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे. एकीकडे निवडणूक आयोग १९ एप्रिल रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी सज्ज झाले आहे तर, दुसरीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे ओपिनियन पोलही समोर येत आहेत. यावरून मतदारांचा कल कोणाच्या बाजूने आहे याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
‘टीव्ही ९’चा देशातील एकूण ५४३ जागांचा ओपिनियन पोल समोर आला आहे. या ओपिनियन पोलमध्ये टीव्ही ९, पीपल्स इनसाईट, पोलस्ट्राटच्या सर्व्हेमध्ये देशातील तब्बल २५ लाख लोकांचे सँपल घेण्यात आले आहेत. या पोलमधून साधारण देशातील मतदारांचा कल कोणत्या बाजूने आहे याचा अंदाज येऊ शकतो. यात लक्ष वेधून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे काही राज्यात भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होणार असून काही राज्यात मात्र भाजपा वर्चस्व गाजवत क्लीन स्वीप करणार आहे. मात्र, काही राज्यांमध्ये काँग्रेसला खातंही उघडता येणार नसल्याचं या पोलमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे काँग्रेससाठी लोकसभा निवडणूक कठीण असणार आहे.
सध्या काँग्रेसचे सरकार असलेल्या हिमाचल प्रदेशात चार जागा आहेत. या चारही जागा भाजपाच्या खात्यात जाण्याची चिन्हे आहेत. एनडीएला ५५.७३ टक्के मते मिळताना दिसत आहेत. शिवाय उत्तराखंडातील पाचही जागा भाजपाला मिळणार असून एनडीएला ५६.७७ टक्के तर इंडिया आगाडीला २६.२४ टक्के मते मिळताना दिसत आहेत. शिवाय आम आदमी पार्टीकडे असलेल्या दिल्लीमध्ये सात पैकी सहा जागांवर भाजपा आपला शिक्का मारणार असून एक जागा ‘आप’च्या वाट्याला जाऊ शकते. काँग्रेसला येथे एकही जागा मिळताना दिसत नाही. आंध्रप्रदेशात एनडीएला ४४.२५ टक्के तर वायएसआरसीपीला ४५.७७ मते मिळताना दिसत आहेत. इंडिया आघाडीला केवळ चार टक्के मते मिळताना दिसत असून काँग्रेसच्या हाती भोपळा लागणार असल्याचा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
हे ही वाचा:
रामनवमी: रावणाच्या अत्याचारातून मुक्तीसाठी भगवान विष्णूंचा सातवा अवतार
ग्लेन मॅक्सवेलने घेतला आयपीएलमधून ब्रेक
‘स्वतः आंबेडकरही भारताचे संविधान बदलू शकत नाहीत’!
मुंबईत झाडांवरील रोषणाईच्या माळा काढण्यास सुरुवात!
झारखंडमध्येही १४ जागांपैकी १२ जागांवर भाजपा विजयो मोहोर उमटवेल तर इंडिया आघाडीला केवळ एकच जागा मिळणार असल्याचे दिसत आहे. तीही इंडिया आघाडीतील घटक पक्षाला मिळेल काँग्रेसला नाही. छत्तीसगडमध्ये भाजपा संपूर्ण वर्चस्व गाजवेल आणि काँग्रेसच्या पदरी निराशा येताना दिसत आहे. राज्यात एनडीएला ५८.०६ टक्के तर इंडिया आघाडीला २८.७९ टक्के मते मिळताना दिसत आहेत. मध्यप्रदेशात सर्वच्या सर्व २९ जागांवर भाजप विजयी होताना दिसत आहे. गुजरातमध्येही भाजपा सर्व २६ जागांवर विजयी होताना दिसत आहे. पंजाबमध्येही काँग्रेसला यश येणार नसल्याचे पोलमध्ये सांगण्यात येत आहे. पश्चिम बंगालमधील ४२ जागांपैकी टीएमसीला २१ तर एनडीएला २० जागा मिळताना दिसत आहेत. इंडिया आघाडीला केवळ एकच जागा मिळताना दिसत आहे.