५८ कोटी कुठले, एवढेच पैसे दिले सोमय्यांनी

५८ कोटी कुठले, एवढेच पैसे दिले सोमय्यांनी

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर INS विक्रांत संदर्भात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली होती. संजय राऊत यांनी ५८ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांच्यावर केला होता. मात्र, किरीट सोमय्या यांनी राज्यपालांना लिहिलेलं पत्र समोर आले आहे.

किरीट सोमय्या यांनी तत्कालीन राज्यपाल शंकर नारायण यांना पत्र लिहिले होते. या पत्रावर किरीट सोमय्या यांची सही असून २०१३ मधील हे पत्र आहे. चर्चगेट रेल्वे स्थानकावर ११ हजार २२४ रुपयांचा निधी जमा झाल्याची माहिती सोमय्या यांनी पत्रातून दिली आहे.

किरीट सोमय्या यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात राज्य सरकारवर टीका केली आहे. विक्रांत युद्धनौकेशी जनभावना जोडली गेलेली आहे. गेली अनेक वर्ष विक्रांतचे स्मारक संग्रहालयात करण्याचे राज्य सरकारने मान्य केले होते. परंतु केंद्र सरकारने निर्णय मागे घेऊन विक्रांतला बुडवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडे निधी नाही अशी सबब दिली जात आहे. म्हणूनच जनभावना कळवण्यासाठी जनतेतून निधी गोळा करण्याचा उपक्रम आज आम्ही चर्चगेट स्टेशन बाहेर राबवला त्यातून ११ हजार २२४ रुपये जमते हा निधी आपणाकडे सुपूर्द करू इच्छितो. महाराष्ट्राची जनता निधी कमी पडू देणार नाही. विक्रांत वाचवण्यासाठी आपण महाराष्ट्र सरकारला आग्रह करावा ही विनंती, असे किरीट सोमय्या यांनी पत्रात म्हटले आहे.

हे ही वाचा:

मानखुर्दमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत वाद

अभिनेते, पटकथा लेखक शिव सुब्रमण्यम यांचे निधन

मांसाहारावरून जेएनयूमध्ये वाद, सहा विद्यार्थी जखमी

या पत्रामुळे संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर केलेले आरोप खरे आहेत का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. किरीट सोमय्या यांनी देशभारातून पैसे जमवले आणि यात ५७ ते ५८ कोटींचा घोटाळा झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना पुरावे देण्याचे आव्हान केले होते.

Exit mobile version