29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरराजकारणपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, नैसर्गिक शेतीकडे वळण्याची हीच वेळ!

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, नैसर्गिक शेतीकडे वळण्याची हीच वेळ!

Google News Follow

Related

आता पुन्हा पूर्वपदावर येऊन शेती व्यवसाय करण्याची गरज आहे. अर्वाचिन ज्ञानाला आता आधुनिकतेची जोड म्हणजेच नैसर्गिक शेती पध्दत असल्याचे मोदी यांनी सांगितले.

देशात जे ८० टक्के अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांनाच या नैसर्गिक शेतीचा (Natural Farming) फायदा अधिक होणार आहे. परंतु, ही शेती पध्दती स्वीकारणे ही काळाची गरज झाली आहे. कमी खर्चात अधिकचे उत्पादन हीच नैसर्गिक शेती आहे. मात्र, उत्पादनावाढीसाठी शेतकरी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. असे दुर्लक्ष होत राहिले तर काही काळातच शेत जमीन नापीक होईल आणि न भरुन निघणारे नुकसान होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी खर्चातल्या नैसर्गिक शेतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. पूर्वी रासायनिक खते नसतानाही उत्पादन चांगले होत होते. परंतु, जुने ते सोने आहे ते अंगिकरण्याची तयारी शेतकऱ्यांनी ठेवली पाहिजे. आणि काळानुरुप हा बदल स्वीकारला तरच उत्पादनात वाढ होणार आहे. असे मोदी म्हणाले.

मोदी पुढे हेही म्हणाले की, आम्हाला आमची शेती रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेतून काढून निसर्गाच्या प्रयोगशाळेशी जोडायची आहे. जेव्हा केव्हा मी निसर्गाच्या प्रयोगशाळेबद्दल बोलतो, तेव्हा ती पूर्णपणे विज्ञानावर आधारित बोलण्याचा माझा उद्देश असतो. हरितक्रांतीत रसायने आणि खते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे हे खरे आहे. परंतु, हे देखील तितकेच खरे आहे की, आपल्याला त्याच्या पर्यायांवरही काम करत रहावे लागेल. त्यामुळेच नैसर्गिक शेतीचा अवलंब हा योग्य पर्यांय आहे.

आता पुन्हा पूर्वपदावर येऊन शेती व्यवसाय करण्याची गरज आहे. जगही त्याच तयारीत आहे. जगाच्या तुलनेत भारताकडे जास्त पोषक वातावरण आहे तसेच, शेती व्यवसायाची मोठी परंपरा भारतात आहे. याच नैसर्गिक शेतीच्या परंपरेचा फायदा उत्पादन वाढीसाठी होणार आहे. केवळ या शेतीपध्दतीला स्विकारून अत्याधुनिक बदल करणे गरजेचा असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

शरद पवार वाचणार स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र!

बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू झाल्यामुळे हाताला काम मिळेल!

महाराष्ट्रात आता बैल धावणार

करण जोहरच्या पार्टीमध्ये सहभागी ठाकरे सरकारमधील मंत्री?

 

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवातील रासायनिक खते आणि कीटकनाशकांपासून शेत जमीन मुक्त करण्याचा संकल्प करू या, असे शेतकऱ्यांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले. देशातील प्रत्येक राज्यला नेसर्गिक शेतीचा अवलंब करण्याची गरज आहे. या अमृत महोत्सवामध्ये प्रत्येक पंचायतीचे किमान एक गाव नैसर्गिक शेतीशी जोडले गेले पाहिजे त्यासाठी कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा