ठाकरे सरकार विरोधात अभाविप आक्रमक! मुंबई विद्यापीठाबाहेर आंदोलन

ठाकरे सरकार विरोधात अभाविप आक्रमक! मुंबई विद्यापीठाबाहेर आंदोलन

‘विद्येच्या मंदीरात राजकारण नको’ असे म्हणत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ठाकरे सरकारच्या विरोधात हल्लाबोल केला आहे. १५ डिसेंबर रोजी ठाकरे सरकारने विद्यापीठांच्या स्वायतत्तेवर घाला घालून, स्वतःचे नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात बदल कारण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत काही निर्णय घेतले. या निर्णयांच्या विरोधात अभाविप गेले दोन दिवस साखळी आंदोलन करत आहे. आज, बुधवार, २२ डिसेंबर रोजी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पस येथे अभाविपने शिक्षणातील वाढत्या राजकीय हस्तक्षेपाविरुद्ध निदर्शने केली.

आज राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले असून या अधिवेशनात राज्यसरकार विद्यापीठ कायद्यातले प्रस्तावित बदल पारित करण्याच्या तयारीत आहे. पण सरकारच्या या मनसुब्या विरोधात अभाविपने पोतराज बनत आक्रमक आसूड ओढला आहे. त्यामुळे एकीकडे विधिमंडळात विरोधीपक्ष सरकारवर तुटून पडला असताना रस्त्यावर विद्यार्थ्यांचा सरकार विरोधातील आक्रोश पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा:

भास्कर जाधव यांनी नौटंकीनंतर अंगविक्षेप मागे घेतले!

हिवाळी अधिवेशनात विधानसभेला मिळणार नवे अध्यक्ष महोदय?

‘ठाकरे सरकारचा धिक्कार असो’…विधिमंडळाच्या पायऱ्यांवरून विरोधकांचे आंदोलन

मुख्यमंत्र्यांचे विश्वासू रवींद्र वायकरांची ईडीकडून ८ तास चौकशी

मंत्रीमंडळातील या वादग्रस्त निर्णयानुसार राज्यातील सर्व विद्यापीठाचे कुलपती हे राज्यपाल असून देखील ते कुलगुरूची थेट नियुक्ती करू शकणार नाहीत. राज्य सरकारच्या शिफारशीनुसार सुचवलेल्या नावामधूनच कुलगुरूची निवड राज्यपालाना करावी लागणार, प्र.कुलपती हे पद निर्माण करत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांची प्र. कुलपती पदी नियुक्ती केली जाणार आहे. विद्यापीठातील गुणवत्ताधारक प्राध्यापक, विद्यार्थ्यावर राजकीय दबावाचा विपरीत परिणाम या निर्णयामुळे होणार आहे. मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आलेल्या या प्रस्तावित बदलाचे आज सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात कायद्यात रूपांतर करण्याचा डाव राज्य शासनाने आखला आहे..

मंत्रिमंडळ निर्णयानुसार विद्यापीठ कायद्यात करण्यात आलेले हे बदल म्हणजे विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर घाला घालण्याचा मोठा डाय आहे. शिक्षण क्षेत्रात कोणत्याही प्रकारे राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असे मत अभाविप कोकण प्रदेश मंत्री अमित ढोमसे यांनी व्यक्त केले. तर विद्यार्थी हिताचा विचार करून संबंधित निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा महाविकास आघाडीला विद्यार्थ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा आंदोलना नंतर अभाविपच्या वतीने देण्यात आला.

Exit mobile version