आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी कायमच चर्चेत असणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी महिलांविषयी गरळ ओकली आहे. महिला आधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात आणि नंतर बलत्काराचे आरोप करतात असे अतिशय बेजबाबदार विधान आझमी यांनी केले आहे. आझमी यांच्या या बेताल वक्तव्यावरून त्यांच्या विरोधात टीकेची झोड उठली आहे.
देशातला कायदा चुकीचा आहे. या कायद्यानुसार लग्नाविना महिलांना पुरुषांसोबत राहाण्याची परवानगी कायदा देतो. लिव्ह इन रिलेशनशिप असे त्याला म्हणतात. महिला या लिव्ह इन मध्ये पुरुषासोबत वर्षभर राहतात आणि नंतर त्यांच्यावर बलात्काराचे आरोप करतात असे वक्तव्य आझमी यांनी केले आहे. इस्लाममध्ये लग्न झालेली महिला परपुरुषासोबत संबंध ठेवू शकत नाही आणि असे सर्वच धर्मात सांगितले आहे. पण लिव्ह इन मध्ये राहून महिला तक्रार करतात आणि त्यामुळे पुरुषांचे आयुष्य उध्वस्त होते असेही आझमी यांनी म्हंटले आहे. आपल्या याच वक्तव्यात आझमी यांनी स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतला पाहिजे असेही म्हटले आहे.
आझमी यांच्या या वक्तव्यांवरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी आझमींचा चांगलाच समाचार घेतला आहे. “अबू आझमी यांना जाब विचारण्याचे त्राणदेखील लाचार मुख्यमंत्र्यांमध्ये उरलेले नाही.” असे भातखळकरांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
महिला वर्षभर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून नंतर बलात्काराची तक्रार करतात असे समस्त महिला वर्गाबाबत अपमानास्पद व आक्षेपार्ह उद्गार बिनदिक्कतपणे काढणाऱ्या आमदार अबू आझमी यांना जाब विचारण्याचे त्राणदेखील लाचार मुख्यमंत्र्यांमध्ये उरलेले नाही… pic.twitter.com/Bb36qjlZ0Z
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 17, 2021