25 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरराजकारणअबू आझमींचा फुत्कार, वंदे मातरम म्हणणार नाही, आमच्या धर्मात नाही!

अबू आझमींचा फुत्कार, वंदे मातरम म्हणणार नाही, आमच्या धर्मात नाही!

विधानसभेत लक्षवेधीदरम्यान प्रचंड गोंधळ

Google News Follow

Related

छत्रपती संभाजी नगरमध्ये घडलेल्या दंगलीसंदर्भातील लक्षवेधीवेळी विधानसभेत प्रचंड गोंधळ निर्माण झाला. आमदार अबू आझमी यांनी या लक्षवेधीसंदर्भात बोलताना आम्ही वंदे मातरम बोलू शकत नाही कारण आमच्या धर्मात अल्लाशिवाय आम्ही कुणासमोरही शीर झुकवत नाही. अगदी आमच्या आईसमोरही नाही, असे फुत्कार काढले. त्यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ निर्माण झाला.

 

अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अखेर सभागृह दहा मिनिटे तहकूब करावे लागले. आमदार अबू आझमी यांनी ही लक्षवेधी मांडली होती. यावेळी त्यांनी ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रगान म्हणण्यास नकार दिला. या मुद्यावरून भाजपचे आमदार आक्रमक झाले. भाजप-शिवसेनेच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर सभागृह तहकूब करण्यात आले.

 

अबू आझमी यासंदर्भात म्हणाले की, औरंगाबादमध्ये आक्रोश रॅली निघाली त्यात मुस्लिमांना अपमानित करण्यात आले. देशाला रक्त हवे होते तेव्हा मुस्लिमांनी आपले रक्त दिले. २९ मार्चला औरंगाबादमध्ये राममंदिराजवळ तीन जण मोटारसायकलवरून आले आणि देशात राहायचे असेल तर वंदे मातरमचा नारा द्यावा लागेल, अशा घोषणा दिल्या. पण आम्ही वंदे मातरम म्हणू शकत नाही. आईसमोरही आम्ही मस्तक झुकवत नाही. आम्ही केवळ अल्लाला मानतो. आम्ही दुनियेत कुणासमोरही डोके झुकवू शकत नाही.

 

वास्तविक लक्षवेधी छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीशी निगडित असताना आ. आझमी यांनी वंदे मातरम म्हणणार नाही, असा विषय उपस्थित केल्याने गोंधळ उडाला. सभागृह सुरु झाल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. आझमी यांना असे आपण बोलू नये. वंदे मातरम हा कोट्यवधी लोकांच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे हा विषयावर बोलू नये.

हे ही वाचा:

तर अमित शहांच्या बाजूला उद्धव ठाकरे असते…

भारत- पाकिस्तान लढत २ सप्टेंबरला

वाशिष्ठी नदीने ओलांडली धोक्याची पातळी, चिपळुणात अतिवृष्टी

जगविख्यात मराठमोळे शरीरसौष्ठवपटू आशिष साखरकर यांचे निधन

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना थांबवल्यानंतर आझमी म्हणाले की, वंदे मातरम बोलण्यासा सांगितल्यामुळे त्या आक्रोश रॅलीवेळी माहोल खराब झाला. रात्री पुन्हा ते लोक आले आणि पुन्हा घोषणाबाजी झाली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर आ. आझमी यांनी मांडलेले मुद्दे खरे नाहीत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते म्हणाले, पोलिसांनी दोन समुदायतील दंगा थांबवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यामध्ये जास्त प्रमाणावार पोलिसच जखमी झाले. यामध्ये ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला ती व्यक्ती जमावात होती. कोणत्याही गेटमध्ये नव्हती. आपल्याकडे या घटनेचे सिसिटीव्ही फुटेज आपल्याकडे असल्याचे ते म्हणाले. सिसिटीव्ही फुटेज पाहूनच पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यातूनच संशयितांना अटक केल्याचेही ते म्हणाले.

आईसमोर शीर झुकवू नका असे कोणताही धर्म सांगत नाही

यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले की,
माझी अबू आझमींना विनंती आहे की, सभागृहात आणि देशात करोडो लोकांची संविधानासहित वंदेमातरम प्रती श्रद्धा आहे. आपण मांडलेले मत योग्य नाही. अशाप्रकारे कोणता धर्म सांगतो आईसमोर झुकू नका? इस्लाम सुद्धा सांगत नाही.
फडणवीस म्हणाले की, वंदे मातरम हे धार्मिक गीत नाही. हे कोणत्याही पूजा अर्चनेचे गीत नाही. अशाप्रकारे अबू आझमींकडून अपेक्षा आहे की, संविधानाला मानतो तोच या सभागृहात येऊ शकतो. करोडो लोकांच्या भावनांना तडा जाऊ देता कामा नये. वंदे मातरम आजही राष्ट्रगान आहे. जन गण मन राष्ट्रगीत आहे. या सभागृहात आपण वंदे मातरम, जन गण मन म्हणतो बाकीचे मुद्दे मांडायचे असतील तर मांडा. हा मुद्दा आणण्याची गरज नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा