अबू-अस्लम भाई भाई, मुस्लिम आरक्षणासाठी आले एकत्र

अबू-अस्लम भाई भाई, मुस्लिम आरक्षणासाठी आले एकत्र

आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने मुस्लीम आरक्षणाची बांग देत विधिमंडळात प्रवेश केला. समाजवादी पक्षाचा आमदार अबू आझमी मुस्लिम आरक्षणाची मागणी करणारे बॅनर्स गळ्यात अडकवून विधिमंडळ परिसरात दाखल झाला.

देशातील तेरा राज्यांप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही नागरिकत्व कायद्यातील सुधारणा आणि नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर (एनआरसी) याच्या विरोधात प्रस्ताव पारित करावा आणि मुसलमान समाजाला ५% आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करणारे बॅनर्स गळ्यात लटकवून अबू आझमी विधी मंडळ परिसरात अवतरला. अबू आझमी हा कायमच आपल्या अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो पण यावेळी त्याला काँग्रेसनेही प्रतिसाद दिला आहे. अबू आझमीच्या या मागणीवर महाराष्ट्र सरकारचे मंत्री असलेले अस्लम शेख यांनीही ‘कबुल है’ म्हटले आहे.

हे ही वाचा:

सरकारने बारा आमदारांसाठी ठेवले विदर्भ,मराठवाड्याला ओलीस

आम्ही मुस्लिम आरक्षण देण्याचे वचन दिले होते. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे. लवकरच आम्ही त्या संदर्भात निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया मंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. अस्लम शेख हे काँग्रेस पक्षाचे नेते असून महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग, बंदरे आणि मत्स्योत्पादन मंत्री आहेत. शेख यांच्याकडे मुंबईचे पालक मंत्री म्हणूनही जबाबदारी देण्यात आली आहे.

Exit mobile version