साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेश राज्याच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार आहे. तर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचाही चेहरा राज्यात सर्वात लोकप्रिय आहे. एबीपी न्यूज आणि सी व्होटर यांनी केलेल्या मतचाचणीतून ही बाब समोर आली आहे. तर काँग्रेस पक्ष हा त्यांच्याकडे असणारे पंजाब हे आणखीन एक राज्य गमावण्याच्या तयारीत आहे.
एबीपी न्यूज ही हिंदी वृत्त वाहिनी आणि सी व्होटर या मतचाचणी घेणाऱ्या संस्थेने २०२२ मध्ये होऊ घातलेल्या ५ निवडणुकांच्या दृष्टीने एक मतचाचणी घेतली आहे. या मतचाचणीमध्ये तब्बल ८१,०० लोकांनी सहभाग नोंदवला आहे. आगामी वर्षात होऊ घातलेल्या उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुकीत नेमके कोण विजयी होणार आणि कोणत्या पक्षाचे सरकार तयार होणार याबद्दल हि मतचाचणी घेण्यात आली होती.
हे ही वाचा:
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची महिला सरपंचाला मारहाण
अँटिलिया, मनसुख हत्याप्रकरणी १० जणांवर भलेमोठे आरोपपत्र
दुबई एक्सपो २०२० मध्येही उभे राहणार राम मंदिर
जितेंद्र आव्हाडांच्या ‘कथित’ ऑडियो क्लिपमुळे ‘साहेबांचे’ महिला धोरण पुन्हा चर्चे
या मतचाचणीचा निष्कर्ष शुक्रवार, ३ सप्टेंबर रोजी एबीपी न्यूजने प्रसिद्ध केला. ज्यानुसार उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता स्थापन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चारही राज्यात भाजपाची सत्ता आहे. ती राखण्यात भाजपाला यश येणार आहे. भाजपा संपूर्ण बहुमत मिळवून सत्ता स्थापन करेल असा दावा या मतचाचाचणीतून करण्यात आला आहे.
तर पंजाबमध्ये काँग्रेस पक्ष आपली सत्ता गमावताना दिसत आहे. पंजाब मध्ये काँग्रेसमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात सुरु असलेला अंतर्गत संघर्ष पक्षाला भोवताना दिसत आहे. पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष सत्ता स्थापन करेल असा अंदाज या चाचणीतून वर्तवण्यात आला आहे.