‘सत्तेचा टांगा पलटी, आणि सत्ताधारी फरार’

‘सत्तेचा टांगा पलटी, आणि सत्ताधारी फरार’

भारतीय जनता पार्टीचे आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतील नालेसफाईची पाहणी केली आहे. मुंबई पालिकेच्या नालेसफाईची पोलखोल गुरुवार, १९ मे रोजी शेलार यांनी केली आहे. नालेसफाईची पाहणी करण्यासाठी गेले असता तिथे कंत्राटदारांची तारांबळ उडाली असल्याचे शेलारांनी सांगितली आहे.

मुंबई महापालिकेने ७८ टक्के नालेसफाईचा दावा केला होता. मात्र जेव्हा शेलारांनी नालेसफाईची पाहणी केली तेव्हा प्रत्येक्षात कोणतीही नालेसफाई झालेली नाही, अशी माहिती आशिष शेलारांनी दिली आहे. ते म्हणाले, महापालिकेने जे आकडे फेकलेत ते सर्व खोटे आहेत. महापालिकेने सांगितले होते की, त्यांनी आतापर्यंत ७८ टक्के नालेसफाई केली आहे. मात्र जेव्हा मी प्रत्येक्षात पाहणी करण्यासाठी गेलो तेव्हा कोणतीही नालेसफाई झालेली नाही, असे दिसून आले. तर मालाड येथील नालेसफाईची पाहणी करणार हे समजताच तिथल्या कंत्राटदारांची तारांबळ उडाली असल्याचे शेलारांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

दर्जेदार वृत्तसंकेस्थळ म्हणून ‘न्यूज डंका’ चा गौरव

राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या, ईडीकडून गुन्हा दाखल

पंजाब पोलिसांनी केला हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश, दोघांना अटक

मनसेच्या पुणे मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्तेच भिडले

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे इतर नेते कुठे फरार झाले आहेत, असा सवालही शेलारांनी केला. ते म्हणाले, ७८ टक्के आकडा हा फक्त पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून शिवसेनेने दिला आहे. दरम्यान, जेव्हा आशिष शेलार नालेसफाईची पाहणी करणार असल्याचे पालकमंत्री, आदित्य ठाकरेंना कळताच त्यांची तारांबळ उडाली होती. त्यांनी नालेसफाची धावती पाहणी केली यावर शेलारांनी त्यांना एवढे दिवस कुठे होतात? असा सवाल केला आहे.
तर सत्तेचा टांगा पलटी, आणि सत्ताधारी फरार! अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

Exit mobile version