आशिष मिश्रा एसआयटीसमोर; आता वास्तव येईल समोर

आशिष मिश्रा एसआयटीसमोर; आता वास्तव येईल समोर

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा अखेर दोन समन्सनंतर लखीमपूर खेरी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीसमोर हजर झाला. आता या घटनेचे धागेदोरे सापडतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लखीमपूर खिरीमध्ये चार शेतकरी संघटनेचे चारजण कारखाली चिरडून मरण पावले होते. त्यानंतर या संघटनेच्या लोकांनी एका चालकासह तीन भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करून ठार केले होते. या घटनेत एका पत्रकारालाही आपला जीव गमवावा लागला होता.

आशिष मिश्रा यांना एसआयटीपुढे पुरावा द्यावा लागेल, ज्यात ते अपघाताच्या वेळी बनबीरपूर येथील कुस्ती स्पर्धेत उपस्थित होते, असे स्पष्ट होईल. तसेच पोलिसांनी मार्ग बदलला असताना त्यांची गाडी अपघातस्थळावर (तिकोनिया रोड) का गेली होती, याचेही उत्तर द्यावे लागेल. आशिष मिश्रा किंवा त्यांचे सुरक्षा कर्मचारी ज्यांच्याकडे ०.३१५ बोअरची बंदूक आहे, ज्याच्या रिकाम्या शेल कारमध्ये सापडल्या आहेत, याबद्दलही वास्तव काय ते समोर येईल.

हे ही वाचा:

आर्यनच्या अटकेनंतर बायजूने शाहरुखच्या जाहिराती बंद केल्या?

‘बेस्ट’चे चालक आता भाड्याने मिळणार!

खो- खोपटू सारिका काळेने आपल्यावरील चित्रपटाचे मानधन खेळाडूंसाठी का दिले?

‘चिपी विमानतळाला विरोध कुणी केला हे लोक जाणतात’

हराइचमधील जगजीत सिंह यांनी आशिष मिश्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. ज्या वाहनाने शेतकर्‍यांना चिरडले गेले, त्यामध्ये आशिष मिश्रा उपस्थित होते, असा आरोप आहे. किसान युनियन सुरुवातीपासून या प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा आणि त्यांच्या मुलाचे नाव घेत आहे.

त्यानंतर प्रशासन आणि शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत यांच्यात झालेल्या संभाषणानंतर आशिष मिश्रा यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, आशिष मिश्रा एसआयटीसमोर चौकशीसाठी हजर होणार होते, पण ते हजर राहू शकले नाहीत. त्यानंतर त्यांना शुक्रवारी संध्याकाळी दुसरा समन्स पाठवण्यात आला होता.

Exit mobile version