साईंची आरती भोंग्यावर होऊ दे, मुस्लिम समाजाची प्रशासनाला विनंती

साईंची आरती भोंग्यावर होऊ दे, मुस्लिम समाजाची प्रशासनाला विनंती

सध्या राज्यात मशिदीवरील भोंग्यांवरून राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मनसेने मशिदींवरच्या भोंग्यांविरुद्ध आंदोलन सुरु केले. मात्र या आंदोलनाचा फटका शिर्डीतील साईबाबांच्या काकड आरतीला बसला आहे. साई मंदिरातील काकड आरती भोंग्यांशिवाय करण्यात आली होती. यावर आता शिर्डीतील मुस्लिम समुदायाने साईबाबांची काकड आरती आणि रात्रीची आरती भोंग्यावर लावण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे.

गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासात प्रथमच साईबाबा मंदिरातील रात्रीची व पहाटेची आरती भोंग्यांशिवाय झाली आहे. याशिवाय सर्व मशिदीत देखील नमाज भोंग्यांशिवाय झाली आहे. परंतु, ‘साई मंदिरावरील लाऊडस्पीकर बंद न ठेवता पुर्ववत सुरू ठेवावे,’ अशी मागणी येथील जामा मशिद ट्रस्ट व मुस्लीम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासात प्रथमच साईबाबा मंदिरातील रात्रीची व सकाळची आरती भोंग्यांशिवाय झाली. साईबाबा देवस्थान हे जागतीक किर्तीचे व सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे. त्यामुळे साईबाबांची आरती पूर्ववत भोंग्यावर व्हावी अशी मुस्लिम समुदायाने मागणी केली आहे.

हे ही वाचा:

या विषयांवर पंतप्रधान मोदींनी नॉर्डिक देशांशी केली चर्चा

कान्स चित्रपट महोत्सवात भारताला ‘कंट्री ऑफ ऑनर’

संदीप देशपांडे, संतोष धुरी विरोधात गुन्हा दाखल

राणा दाम्पत्याला अटी- शर्तींसह जामीन मंजूर

या निवेदनात असेही म्हटले आहे की, मशिदींवरील पहाटेचा अजान बंद करू मात्र साई मंदिरातील काकड आरती भोंग्यावर करावी, अशी मुस्लिम समुदायाने मागणी केली आहे. शिर्डी हे समभावाचे प्रतीक असल्याचे मुस्लिम समुदायाचे म्हणणे आहे.

Exit mobile version