25 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरराजकारणपंजाबमध्ये चालला झाडू

पंजाबमध्ये चालला झाडू

Google News Follow

Related

पंजाबमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हे आम आदमी पक्षासाठी खुश खबर देणारा ठरला आहे. आम आदमी पक्षाने दिल्ली पाठोपाठ आता पंजाबची सत्ताही काबीज केली आहे. काँग्रेसला त्यांनी सत्तेतून उखडून फेकले आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाने आपल्या सत्तेचा विस्तार आणखीन एका राज्यात वाढवला आहे.

आम आदमी पक्ष पंजाबमध्ये सत्ता स्थापन करेल हे सुरवातीपासून भाकीत करण्यात येत होते. मत चाचण्यांमध्येही तोच अंदाज वर्तवला जात होता. त्यानुसार आम आदमी पक्ष पंजाब मध्ये सत्ता स्थापन करत आहे. या आधी २०१७ साली देखील आम आदमी पक्षाची हवा असल्याचे म्हटले जात होते. पण त्यावेळी काँग्रेसने कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन केली.

पण ही सत्ता टिकवण्यात काँग्रेसला अपयश आले आहे. याला काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह आणि गटबाजीचे राजकारण कारणीभूत ठरले. कॅप्टन अमरिंदर सिंग हे मुख्यमंत्री असताना काँग्रेसने नवज्योत सिंग सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून पुढे आणले. यातून संघटनेतले अंतर्गत कलह वाढत गेले. परिणामी निवडणुकीच्या काही महिने आधीच काँग्रेस पक्षाने पंजाबचे मुख्यमंत्री बदलले आणि चन्नी यांना संधी दिली.

हे ही वाचा:

उत्पल पर्रीकर पराभूत

काँग्रेसचे पुन्हा पानिपत! राहुल पाठोपाठ प्रियांकाही नापास

गोव्यात भाजपाच्या सरकार स्थापनेच्या हालचाली; १४ मार्चला शपथविधी?

आसाम नगरपालिकेमध्ये भाजपाचा मोठा विजय

यामुळे अमरिंदर सिंग यांनी पक्षाला रामराम ठोकत नवीन पक्ष स्थापन केला. या सगळ्या गटबाजीचा राजकारणातून काँग्रेस अखेरपर्यंत सावरू शकली नाही. यातूनच आम आदमी पक्षाचा विजयाचा मार्ग सुकर झाला. पंजाबमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही पराभूत झाले आहेत.

आपचे नेते भगवंत मान हे आता पंजाबमध्ये मुख्यमंत्री पदी विराजमान होणार आहेत. आपने निवडणुकीपूर्वीच मान यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा