एक व्यंगचित्र ठरणार आम आदमी पक्षाची डोकेदुखी?

एक व्यंगचित्र ठरणार आम आदमी पक्षाची डोकेदुखी?

देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. उत्तर प्रदेश, पंजाब मणिपूर, गोवा आणि उत्तराखंड या पाच राज्यांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्व राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने प्रचारात गुंतले आहेत. निवडणूक प्रचार सभांवर कोविड निर्बंधांमुळे बंदी आहे. पण तरीदेखील समाजमाध्यमांमधून राजकीय पक्ष जोरदार प्रचारात गुंतले आहेत.

पण या सगळ्यात आता आम आदमी पक्षाची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. याचे कारण ठरले आहे एक कार्टून! उत्तराखंडमधील आम आदमी पक्षाच्या अधिकृत ट्विटर खात्यावर शुक्रवार, २१ जानेवारी रोजी सत्ताधारी भाजपाच्या विरोधात टीकास्त्र डागण्यात आले. या एका कार्टूनच्या माध्यमातून आम आदमी पक्षाने भाजपवर निशाणा साधला. पण आता हेच व्यंगचित्र आम आदमी पक्षाच्या अडचणी वाढवणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आम आदमी पक्षाने वापरलेले हे व्यंगचित्र म्हणजे लाटी नावाचे एक कार्टून कॅरेक्टर आहे. पण आम आदमी पक्षाने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता हे कार्टून वापरले आहे. कांचन जादली या कलाकाराने लाटी या कार्टून कॅरेक्टरची निर्मिती केली असून त्यावर तिचा कॉपीराइट आहे. पण कांचन हिच्याकडून कोणतीही परवानगी न घेता आम आदमी पक्षाने लाटी हे कार्टून आपल्या प्रचारासाठी वापरले.

हे ही वाचा:

‘आगप्रकरणातील जखमींना दाखल करण्यास नकार देणाऱ्या रूग्णालयांवर कारवाई करावी’

राजपथवर धावणार महाराष्ट्राचा चित्ररथ

डिसले यांचा शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याचा मार्ग मोकळा

फेक न्यूज पसरवणाऱ्या पाकिस्तानी वेबसाईट आणि यूट्यूब चैनल्सवर भारत सरकारची कारवाई

यावरूनच लाटी या कार्टून कॅरेक्टरची निर्माती असलेली कांचन जादली हिचा संताप झाला आहे. कांचन हिने ट्विट करत अम आदमी पक्षावर निशाणा साधला आहे. ‘लाटी हे माझं कॉपीराईट असलेलं कार्टून कॅरेक्टर आहे. तुम्ही त्याचा गैरवापर केला असून हा कॉपीराईट कायद्याचा भंग आहे. तेव्हा आम आदमी पक्षाच्या ट्विटर खात्यावरून हे कार्टून उतरवण्यात यावे आणि आम आदमी पक्षाने यासाठी रीतसर माफी मागावी अशी मागणी कांचन यांनी केली आहे. त्यामुळे आता हे कार्टून आम आदमी पक्षाची डोकेदुखी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

Exit mobile version